देश

उतरवला भगवा झेंडा; राजस्थानमध्ये नवा सांस्कृतिक वाद चव्हाट्यावर

सकाळ डिजिटल टीम

जयपूर: भारतात सांस्कृतिक प्रतिके आणि त्यासंदर्भातील वाद प्रसिद्ध आहेत. ठिकठिकाणी असे वाद प्रचलित आहेत. अशा वादांवरुन बरेच मोठे वादंग देखील वेळोवेळी पहायला मिळाले आहेत. असाच एक नवा वाद आता आकार घेताना दिसतोय. राजस्थानातील जयपूरपासून १० किमी अंतरावर असलेला आमागढ (अंबागढ) किल्ला सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा वाद हिंदूत्ववादी संघटना आणि आदिवासी मीणा समुदायामध्ये आहे.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणाची सुरुवात २१ जुलैपासून सुरु झाली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे. या व्हिडीओमध्ये आदिवासी मीणा समुदायाचे काही लोक आमागढ किल्ल्यावरील भगवा झेंडा उतरवताना दिसत आहेत. हा भगवा झेंडा उतरवताना तो फाटल्याचा दावा करत आरएसएसशी संबधित अनेक लोकांनी या प्रकाराचा निषेध केला आहे.

राज्यसभेतील भाजपचे खासदार किरोडीलाल मीणा यांनी राजस्थान सरकारला पत्र लिहून या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. सोबतच किरोडीलाल यांनी आमदार रामकेश मीणा यांच्या अटकेची मागणी करत म्हटलंय की, मीणा समाजाचे लोक कायमच हिंदू होते आणि ते पुढे देखील हिंदू परंपरांचं पालन करतील. २१ जुलै रोजी झालेल्या या घटनेनंतर मीणा समुदाय आणि हिंदू संघटनांनी एकमेकांविरोधात IPC च्या २९५ कलम आणि आयटी कायद्याअंतर्गत FIR दाखल केली आहे.

मीणा समाजातील लोकांचा आरोप आहे की युवा शक्ती मंच नावाच्या एका संघटनेने आमागढ किल्ल्यावर एका खांबावर भगवा झेंडा लावला मंदिरात परिसरातील प्राचीन मुर्त्यांच्या जागी नव्या प्रतिमा ठेवल्या आणि त्या ठिकाणी अंबिका भवानी माता मंदिर असल्याचा दावा केला जातो आहे. मीणा समुदायाचा पहिल्यापासूनच हा दावा आहे की, आमागढ किल्ला आदिवासी मीणा समुदायाच्या राजांचा आहे आणि त्याठिकाणी नाढला गोत्राच्या मीणांचा जुना आमागढ किल्ला आणि अंबा मातेचे प्राचीन मंदिर आहे. त्यामुळे, आदिवासी आणि हिंदू धर्मातील जुनापुराणा वाद आता या निमित्ताने पुन्हा एकदा वर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT