Ghulam Nabi Azad esakal
देश

एक काश्मिरी भाजपमध्ये कसा काय जाऊ शकतो? गुलाम नबी आझादांच्या वक्तव्याने खळबळ

धनश्री ओतारी

काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली ती म्हणजे भाजप प्रवेशाची. दरम्यान, या चर्चेला वर आझाद यांनी मोठे वक्तव्य करत खळबळ माजवली आहे. एक काश्मिरी भाजपमध्ये कसा काय प्रवेश करू शकतो? असे अंदाज वर्तवण्याची मला चीड येते. असे वक्तव्य आझाद यांनी केलं आहे.(How can a Kashmiri join BJP? Ghulam Nabi Azad)

एका वृत्तसंस्थेनुसार, गुलाम नबी आझाद आता भाजपसोबत युती करतील, असं काँग्रेस नेत्यांकडून सांगितलं जात आहे. दरम्यान, आझाद यांनी काँग्रेसचा हा मुर्खपणा असल्याचे म्हटले आहे. तसेच, एक काश्मिरी भाजपमध्ये कसा काय प्रवेश करू शकतो? असे अंदाज वर्तवण्याची मला चीड येते. मी कॉलेजमध्ये असल्यापासून काँग्रेसमध्ये होतो. मी कधीच भाजपमध्ये जाऊ शकत नाही. असे स्पष्ट सांगत मी काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत माझा स्वत:चा पक्ष उतरवेल. अशी जाहीर घोषणा आझाद यांनी यावेळी केली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी सुमारे पाच दशकांनंतर पक्षाचा निरोप घेतला. यावेळी त्यांनी देशातील सर्वात जुना पक्ष आता "पूर्णपणे नष्ट" झाला आहे आणि त्याचं नेतृत्व अंतर्गत निवडणुकांच्या नावाखाली 'फसवणूक करत आहे.' असा आरोप त्यांनी यावेळी केला.

आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा देताना सोनिया गांधी यांना एक पत्रं लिहीत राहुल गांधींवर टीका केली होती. राहुल गांधी आपल्या अवतीभोवती अनुभव नसलेल्या लोकांना ठेवतात. राहुल गांधींचे सुरक्षा रक्षक आणि पर्सनल स्टाफच सर्व निर्णय घेतो की काय असं वाटतंय. राहुल गांधी राजकारणात आल्यानंतर दुर्देवाने त्यांना उपाध्यक्ष करण्यात आले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसची कार्यप्रणालीच उद्ध्वस्त करून टाकली. त्यांनी पक्षाची सल्लागार टीमच नष्ट करून टाकली, अशी टीकाही त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

Milk Rate : पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक; वार्षिक उलाढाल ३८७ कोटीवर

SCROLL FOR NEXT