how gangster vikas dubey arrested at ujjain mahakal temple 
देश

Video : 'होय मीच विकास दुबे, कानपूर वाला'; काय घडलं उज्जैनच्या मंदिरात?

सकाळ डिजिटल टीम

उज्जैन (मध्य प्रदेश) : उत्तर प्रदेशातील गँगस्टर विकास दुबेला आज, मध्य प्रदेशात पोलिसांनी अटक केली. गेल्या सहा दिवसांपासून वेगवेगळ्या राज्याच्या पोलिसांना गुंगारा देणारा विकास दुबे नाट्यमयरित्या पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. एका बाजुला पोलिस त्याला पकडण्यात आल्याचं सांगत आहेत. तर, दुसरीकडे तो स्वतः अटक व्हावी, यासाठी प्रयत्न करत होता, असं बोललं जातंय.

विकास दुबे बिथरला!
उज्जैनच्या महाकाल मंदिरात विकास दुबेला अटक करण्यात आली. सुरुवातीला सिक्युरिटी गार्डने त्याला ओळखल्याचं सांगण्यात आलं होतं. मंदिरातील पुजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर वेगळाच प्रकार समोर आला आहे. या संदर्भात नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलंय की, आशिष नावाच्या पुजाऱ्याने या संदर्भात सविस्तर माहिती दिली. त्याने सांगितले की, विकास दुबे याने 250 रुपयाची देणगी पावती घेतली होती. त्यानंतर तो मंदिर परिसरात आला. परिसरात तो बिथरला होता. मी विकास दुबे आहे. मी गँगस्टर विकास दुबे आहे, असे तो जोर जोरात ओरडू लागला. सुरुवातीला सिक्युरिटी गार्ड, आणि बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना त्यावर विश्वास बसला नाही. परंतु, सिक्युरिटी गार्डपैकी एकानं त्याला ओळखलं आणि त्याने पोलिसांना माहिती दिली. या सगळ्या प्रकारानंतर महाकाल पोलिस चौकीतील पोलिस तेथे हजर झाले आणि त्यांनी विकास दुबेला पकडून पोलिस ठाण्यात नेलं. मुळात विकास दुबे पावती करत असतानाच, एका गार्डने त्याच्याविषयी संशय व्यक्त केला होता. 

एन्काउंटरची होती भीती
गँगस्टर विकास दुबेचा माग गेले सहा दिवस काढण्यात येत होता. पोलिस त्याच्या मागावर होते. त्याच्या काही साथीदारांना ठार करण्यात पोलिसांना यश आलं होतं. 3 जुलै रोजी कानपूरमध्ये पोलिस चकमकीत 8 पोलिस हुतात्मा झाले होते. त्यानंतर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचे पोलिस त्याच्या मागावर होते. आज, पहाटे विकासचा साथीदार प्रभात मिश्रा याला पोलिसांनी कानपूरजवळ एन्काउंटरमध्ये ठार केलं होतं. ही बातमी ऐकल्यानंतर विकासलाही एन्काउंटरची भीती वाटू लागली होती. त्यामुळं त्यानं त्यानंतर उज्जैनच्या महाकाल मंदिरात स्वतःला अप्रत्यक्षपणे सरंडर केल्याचं बोललं जातंय. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो-धो! पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; पुणे-रायगडला 'रेड अलर्ट', मुंबईसह 26 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा

Police Transfer: पोलिसांत मोठा फेरबदल! १२५ डीएसपी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; अनेक जिल्ह्यांना नवे अधिकारी, कुणी घेतला निर्णय?

Pune News: मोठी दुर्घटना टळली! कुसगाव खिंडीत दरड कोसळल्याने राजगड–हवेली मार्गावरील वाहतूक ठप्प; प्रशासनाने तातडीने हटवला अडथळा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाची संततधार; घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस ‘रेड अलर्ट’

Pune Water Crisis: पुण्याची पाणीचिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीतील साठा गतवर्षीपेक्षा पाचपट कमी; केवळ ७६ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक

SCROLL FOR NEXT