esakal

देश

Anti-Terror Policy : केंद्र सरकारचे ‘PRAHAAR’ धोरण: दहशतवादाविरुद्ध निर्णायक पाऊल

Anti-Terror Policy PRAHAAR : सायबर अन् ड्रोन हल्ल्यांच्या आव्हानांवर लक्ष्य केंद्रीत; जाणून घ्या, या धोरणात कशाचा उल्लेख आहे?

Mayur Ratnaparkhe

India Counter Terrorism Policy : गृह मंत्रालयाने 'प्रहार' नावाचे भारताचे पहिले व्यापक दहशतवादविरोधी धोरण जारी केले आहे. या धोरणात सीमापार दहशतवादाचा उल्लेख आहे आणि गुन्हेगारी हॅकर्स व सायबर हल्ल्यांमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचाही उल्लेख करण्यात आला आहे. 

त्यात म्हटले आहे की देशाला भूमी, जल आणि वायू या तिन्ही मार्गांनी दहशतवादी धोक्यांचा सामना करावा लागतो. धोरणानुसार, "भारत दहशतवादाला कोणत्याही विशिष्ट धर्म, वंश, राष्ट्रीयत्व किंवा संस्कृतीशी जोडत नाही." धोरणात असे म्हटले आहे की दहशतवादी गट रसद आणि भरतीसाठी संघटित गुन्हेगारी नेटवर्कचा वापर वाढत्या प्रमाणात करत आहेत.

ते निधी आणि ऑपरेशनल मार्गदर्शनासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, इन्स्टंट मेसेजिंग अॅप्लिकेशन्स, एन्क्रिप्शन टूल्स, डार्क वेब आणि क्रिप्टो वॉलेटचा वापर याकडेही इशारा केला गेला आहे. तसेच यामध्ये अनामिक कुरपतींबद्दल देखील चिंता व्यक्त केली गेली आहे.

गृह मंत्रालयाने म्हटले आहे की दहशतवादी गट भारतीय तरुणांना भरती करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकदा ओळख पटल्यानंतर, पोलिस अशा व्यक्तींविरुद्ध कारवाई करतात. तसेच सामाजिक आणि धार्मिक नेत्यांची भूमिका देखील अधोरेखित करण्यात आली आहे.  धोरणात अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (आयएसआयएस) सारख्या जागतिक दहशतवादी गटांच्या नावांचा उल्लेख  करत, असे म्हटले आहे की त्यांनी स्लीपर सेलद्वारे भारतात हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

District Bank election:चुकीचे लोक नकोत, म्हणून स्वाभिमान बाजूला ;डॉ. सुजय विखे पाटील ; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Marathi News Live Updates: आंबेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई; सात हायवा जप्त

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT