Human Indian Flag World Record Human Indian Flag World Record
देश

World Record : चंदीगडच्या स्टेडियममध्ये ७ हजार विद्यार्थ्यांनी बनवला मानवी तिरंगा

केंद्र सरकारच्या अभियानांतर्गत यंदा देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे

सकाळ डिजिटल टीम

Human Indian Flag World Record नवी दिल्ली : देशाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आजपासून देशभरात ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू झाली आहे. चंदिगडमधील क्रिकेट स्टेडियममध्ये (Cricket Stadium) मानवी साखळी करून तिरंगा (Indian Flag) फडकवण्यात आला. या तिरंग्यात ७,००० विद्यार्थ्यांनी मानवी साखळी बनवून विश्वविक्रमात आपली भूमिका बजावली.

१५ ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या अभियानांतर्गत यंदा देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. आजपासून घरोघरी ‘हर घर तिरंगा’ सुरू झाली आहे. चंदीगडमधील सेक्टर १६ येथील क्रिकेट स्टेडियमवर सर्वांत मोठ्या मानवी साखळीने तिरंगा (Indian Flag) फडकवण्यात आला.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री मीनाक्षी लेखी, चंदीगडचे (Chandigarh) प्रशासक बनवारीलाल पुरोहित आणि कुस्तीपटू योगेश्वर दत्त, एनआयडी फाऊंडेशन आणि चंदीगड विद्यापीठाने आयोजित केलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड टीमच्या उपस्थितीत मानवी तिरंग्यासाठी रांगेत उभे असताना विद्यार्थ्यांनी हवेत तिरंग्याचा आकारही काढला.

राष्ट्रध्वज फडकावणाऱ्या सर्वांत मोठ्या मानवी साखळीचा यापूर्वीचा जागतिक विक्रम अबुधाबीमध्ये जीईएमएस (GEMS) एज्युकेशनने केला होता. तो विक्रम चंदीगडमध्ये तुटला आहे, असे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी स्वप्नील डांगरीकर म्हणाले.

शेवटचा विक्रम कधी सेट झाला?

संयुक्त अरब अमिरातने २०१७ मध्ये ४,१३० लोकांसह मानवी राष्ट्रध्वजासह जागतिक विक्रम केला होता. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित म्हणाले की, भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या यशस्वी विश्वविक्रमाच्या निर्मितीने जगाला मोठा संदेश दिला आहे. हा कार्यक्रम माझ्या कल्पनेपेक्षा मोठा झाला आहे. मी चंदिगड विद्यापीठाचे कुलपती आणि एनआयडी फाउंडेशनचे प्रधान संरक्षक एस सतनाम सिंग संधू यांचे अभिनंदन करतो. ज्यांच्या टीमने ही कामगिरी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूरला दररोज पाणीपुरवठा! नव्याने टाकली जाणार ७१५ किमी पाइपलाइन; १५ ते ३२ लाख लिटरचे असतील २९ जलकुंभ; ८९२ कोटींपैकी २०० कोटी रोख्यातून उभारले जाणार

Morning Breakfast Recipe: हिवाळ्यात सकाळच्या नाश्त्यात मुलांसाठी बनवा 'हे' 2 इन्स्टंट पदार्थ, लगेच नोट करा रेसिपी

संचमान्यतेपूर्वी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बोगस नोंदणी! मधूनच शाळा बदललेल्या विद्यार्थ्यांची होणार पडताळणी; इयत्ता अकरावी-बारावीसाठी बायोमेट्रिक हजेरीचे बंधन

Messi in Mumbai: अमृता फडणवीस यांनाही नाही आवरला मेस्सीसोबत सेल्फी घेण्याचा मोह... Video Viral

महापालिकेचा याच आठवड्यात वाजणार बिगुल! भावी नगरसेवकांकडून त्यांच्या प्रभागात आरोग्य शिबिरे, महासेवा शिबिरांसह ‘होम मिनिस्टर’चे डिजिटल फलक, वाचा...

SCROLL FOR NEXT