husband posted photo his wife on social media call girl at up 
देश

पत्नीचे छायाचित्र अन् मोबाईल नंबर केला व्हायरल...

वृत्तसंस्था

आझमगड (उत्तर प्रदेश): एकाने आपल्या पत्नीचे छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड करून, अश्लिल संवादासाठी पत्नीचा नंबर देऊन संपर्क करण्यास सांगितले. पत्नीला सतत फोन येऊ लागल्यानंतर तिने गुन्हा दाखल केला. पतीनेच हे कृत्य केल्याचे तपासात पुढे आले आहे.

जिल्ह्यातील ठुठिया गावामध्ये ही घटना घडली आहे. गावातील एका युवकाचे दोन वर्षापूर्वी विवाह झाला होता. पण, लग्नामध्ये हुंडा दिला नाही म्हणून पत्नीला त्रास देत होता. सततच्या त्रासाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली होती. पत्नी माहेरी गेल्यामुळे नवऱयाने असे कृत्य केल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीनंतर आरोपी पतीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

पोलिस अधिक्षक त्रिवेणी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपीने हुंड्यात दुचाकी न दिल्याने पत्नीचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल केले. शिवाय, मोबाईल नंबर सार्वजनिक करुन अश्लिल संवाद साधण्याबरोबरच अब्रूची किंमतही लावली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन तात्काळ आरोपी पतीला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT