Husband commits suicide by texting his wife Husband commits suicide by texting his wife
देश

‘नोकरी करणाऱ्या व्यक्तीशी लग्न कर’ असा व्हॉट्सॲप करून पतीची आत्महत्या

सकाळ डिजिटल टीम

‘मी निघत आहे. तुम्ही चांगले राहा. नोकरी करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीशी लग्न कर’ असा पत्नीच्या व्हॉट्सॲपवर मेसेज करून एका ३५ वर्षीय पतीने (commits suicide) गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात घडली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहे. सतीशने दोन पानी सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे. (Husband commits suicide by texting his wife)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरदा येथील छिंदवाडा येथील रहिवासी सतीश बिऱ्हाडे याचा जून २०२० मध्ये तिमरणी समोटा तिलवारीसोबत विवाह झाला होता. पत्नी समोटा ही वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर बीटेक केल्यानंतरही सतीश बेरोजगार होता. लग्नानंतर दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली. वाद इतका वाढला की दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. १५ एप्रिल रोजी समोटा नोकरीवर गेली होती. यावेळी नवरा हा घरी एकटाच होता.

पत्नी आलमपूर येथील माहेरीच थांबली. शनिवारी रात्री एक वाजताच्या सुमारास पतीने पत्नीला काही मेसेज (message) पाठवले. हे मेसेच पत्नीने रविवारी सकाळी वाचले. यानंतर तिने फोन केला. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर ती हरदा येथे पोहोचली. तेव्हा घराचा दरवाजा उघडला नाही. तिने पोलिसांना फोन केला. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता तिचा पती फासावर लटकलेला (commits suicide) आढळला.

पतीने केले होते नंबर व्हयरल

दोन वर्षांपूर्वी आमचे लग्न झाले होते. तेव्हापासून आमच्यात वाद सुरू होता. प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले आणि कोर्टात अर्ज केला. यानंतरही एकत्र राहत होते. चार जानेवारी रोजी पतीने समोट्याचे दोन्ही मोबाईल नंबर आक्षेपार्ह शब्दांसह सोशल मीडियावर व्हायरल केले होते. यानंतर याची हरदा पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. नंबर व्हायरल झाल्यानंतर अश्लील कॉल येऊ लागले, असे मृताची पत्नी समोटा हिने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT