Hyderabad CEO Death Video
Hyderabad CEO Death Video eSakal
देश

Hyderabad CEO Death Video : स्टंटच्या नादात कंपनीच्या सीईओंनी गमावला जीव; रामोजी फिल्म सिटीतील दुर्घटनेचा व्हिडिओ समोर

Sudesh

Ramoji Film City Accident CEO Death : हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये झालेल्या कार्यक्रमात अपघात होऊन, एका कंपनीच्या सीईओंना आपला जीव गमवावा लागला होता. व्हिस्टेक्स एशिया या कंपनीचा सिल्व्हर ज्युबली सोहळा याठिकाणी सुरू होता. या दुर्घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

Vistex Asia या कंपनीने आपल्या सिल्व्हर ज्युबली कार्यक्रमासाठी रामोजी फिल्म सिटीमधील हॉटेल आणि स्टेज बुक केले होते. या कार्यक्रमाला सुमारे 700 लोक उपस्थित होते. यावेळी कंपनीचे फाउंडर सीईओ संजय शाह (Sanjay Shah) आणि कंपनीचे प्रेसिडेंट राज डाटला यांनी ग्रँड एन्ट्री करण्याचा प्लॅन केला होता. मात्र, यावेळीच ही भीषण दुर्घटना झाली.

ठरलेल्या प्लॅननुसार कंपनीचे सीईओ आणि प्रेसिडेंट एका काँक्रीट स्टेजवर बनवलेल्या पिंजऱ्यात उभे होते. हा पिंजरा क्रेनच्या सहाय्याने सुमारे 20 फूट उंच उचलण्यात आला होता. याच्या दोन्ही बाजूला फटाक्यांनी आतषबाजी सुरू होती. काही वेळ हा पिंजरा वर ठेऊन, नंतर हळू-हळू खाली आणण्यात येणार होता.

मात्र हा पिंजरा हवेत असतानाच, याला असलेली तार तुटली आणि हे दोघेही वरुन खाली कोसळले. यानंतर दोघांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र, उपचारांदरम्यान संजय शाह यांचा मृत्यू झाला. राज डाटला यांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.

संजय शाह यांनी 1999 साली या कंपनीची स्थापना केली होती. सध्या या कंपनीचा टर्नओव्हर तब्बल 300 मिलियन डॉलर्स एवढा आहे. या अपघात प्रकरणी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT