crime. 
देश

पत्नी परपुरुषासोबत गेली पळून, पतीला आला राग; 18 महिलांची केली हत्या

सकाळन्यूजनेटवर्क

हैदराबाद- पोलिसांनी एका 45 वर्षीय सीरिअल किलरला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे, 18 महिलांच्या हत्येमागे या सीरिअल किलरचा हात असल्याची माहिती हैदराबाद पोलिसांनी दिली आहे. महिलांच्या हत्येशिवाय इतर अनेक गुन्हे त्याने केले असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. नुकत्याच हत्या झालेल्या दोन महिलांच्या प्रकरणाचाही यामुळे उलगडा झाला आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

आरोपीने गेल्या 24 वर्षात 18 महिलांची हत्या केली असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. मंगळवारी दोन महिलांच्या हत्येप्रकरणी हैदराबादचे पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी एकाला अटक केली होती. अटकेनंतर आरोपीचा तब्बल 21 गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचं स्पष्ट झालं आहे. संपत्तीशी संबंधित गुन्हे, पोलिस कोठडीतून पळून जाणे यासह हत्येसारख्या गंभीर प्रकरणी आरोपीवर गुन्हे दाखल आहेत. 

'जो बोलता है, वो बिकता है'; एलॉन मस्कनी असं काही म्हटलं की कंपनीचं...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचं वयाच्या 21 व्या वर्षी लग्न झाले होते. पण, लग्नाच्या काही दिवसानंतरच त्याची पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेली. या गोष्टीचा त्याच्या मनात प्रचंड राग होता. तेव्हापासून तो महिलांबद्दल द्वेष बाळगत होता. याच रागातून त्याने अनेक महिलांची हत्या केली आहे. आरोपीने वयाच्या 25 व्या वर्षीपासूनच गुन्हे करण्यास सुरुवात केली होती. 

आरोपी शरीरसुखाच्या बहाण्याने अविवाहित आणि विवाहित महिलांना आपल्या जाळ्यात अडकवायचा. त्यानंतर महिलांना भेटण्यासाठी बोलवायचा. महिलेसोबत बसून दारु प्यायचा. त्यानंतर त्या महिलेची हत्या करायचा आणि महिलेकडील मौल्यवान वस्तू घेऊन घटनास्थळावरुन पळून जायचा, असं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपीने 2009 पासून आतापर्यंत 18 हत्या केल्या आहेत. 2009 मधील एका हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेपची शिक्षादेखील झाली होती. पण, शिक्षा भोगत असताना तो तुरुंगातून पळाला. यादरम्याने त्याने 5 हत्या केल्या आहेत. 

farmer protest: दिल्ली हिंसाचारप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

एका व्यक्तीने आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार 1 जानेवारीला पोलिसामध्ये दाखल केली होती. पोलिसांना 4 जानेवारीला एका महिलेचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळला. तपासामध्ये पोलिसांना कळालं की, मृत महिला आणि आरोपीने एकाच रिक्षातून प्रवास केला होता. आरोपीने महिलेला एका निर्जनस्थळी घेऊन गेले. त्यानंतर दारु पाजून तिची हत्या केली. महिलेचा मृतहेद जळालेल्या अवस्थेत आढळला होता.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT