Supreme Court  Supreme Court
देश

‘आई व्हायचे आहे, कैदी पतीला पॅरोल द्या’; सरकार पोहोचले सर्वोच्च न्यायालयात

सकाळ डिजिटल टीम

जयपूर : काही काळापूर्वी उच्च न्यायालयाने मूल जन्माला घालणाऱ्या कैद्याला १५ दिवसांचा पॅरोल दिला होता. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आता राजस्थान सरकारने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. हे प्रकरण राज्य सरकारच्या वतीने सरन्यायाधीश एनव्ही रामण्णा यांच्यासमोर ठेवले आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर अनेक कैदी पॅरोलची (Parole) मागणी करीत आहेत, असे मुख्य न्यायमूर्तींना सांगण्यात आले.

राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले आहे की, राज्याच्या नियमानुसार मुले जन्माला घालण्यासाठी पॅरोल (Parole) द्यायचा की नाही याबाबत कोणताही स्पष्ट नियम नाही. त्यानंतर या आदेशामुळे अडचणी येत आहेत. अशा अर्जांचा पूर आला आहे. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयात २९ जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

यावर्षी एप्रिल महिन्यात राजस्थान (Rajasthan) उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठाने पत्नीशी संबंध आणि मूल झाल्याच्या कारणावरून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला पॅरोल मंजूर केला होता. त्या निकालात न्यायालयाने म्हटले होते की, गर्भधारणा होऊ न देणे म्हणजे पत्नीच्या अधिकारांचे उल्लंघन करणे होय.

३४ वर्षीय नंदलाल भिलवारा याला सत्र न्यायालयाने २०१९ साली एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून तो अजमेर कारागृहात बंद आहे. पत्नी रेखाने अजमेरच्या जिल्हा पॅरोल समितीच्या अध्यक्षांकडे अर्ज करून पतीला पॅरोल मिळावा, जेणेकरून तो आई होऊ शकेल, अशी मागणी केली होती. हे प्रकरण राजस्थान उच्च न्यायालयात पोहोचले. राज्याच्या पॅरोल नियमांमध्ये अशी स्पष्ट तरतूद नसली तरी महिलेचा अधिकार लक्षात घेता कैद्याला पॅरोलचा आदेश देतो, असे म्हटले होते.

विवाहित जीवनाशी संबंधित

कैदीला पॅरोल मंजूर करताना न्यायालयाने पॅरोलच्या नियमांचीही दखल घेतली होती. पॅरोलच्या नियमात असा कोणताही नियम नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते. परंतु, महिलेला दिलासा देताना न्यायालयाने म्हटले होते की, पत्नीची लैंगिक इच्छा आणि भावनिक गरजा विवाहित जीवनाशी संबंधित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT