Airforce Agniveer Recruitment 2022 esakal
देश

IAF Agniveer Result 2022 : वायुसेनेच्या अग्निवीर भरती परीक्षेचा निकाल जाहीर

सकाळ डिजिटल टीम

Indian Air Force Agniveer Result 2022 : भारतीय वायुसेनेने अग्निवीर पदांच्या भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, परीक्षा दिलेले उमेदवार agnipathvayu.cdac.in या अधिकृत साइटवर जाऊन निकाल पाहू शकणार आहेत. 24 जुलै 2022 रोजी हवाई दलाने या परीक्षेचे आयोजन केले होते.

पहिल्या टप्प्यातील परीक्षा 24 जुलै 2022 ते 31 जुलै 2022 दरम्यान हवाई दलाकडून घेण्यात आली होती. पहिल्या टप्प्यातील परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना आता दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षेसाठी बोलावले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा 1 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. अग्नीवीर अंतर्गत भरतीसाठी 7 लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते. या भरती मोहिमेद्वारे हवाई दलातील अग्निवीरच्या एकूण 3500 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 24 जून 2022 पासून सुरू झाली आणि 5 जुलै 2022 पर्यंत चालू होती.

या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्याची कमाल शैक्षणिक पात्रता विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण आहे. उमेदवाराच्या वयाबद्दल बोलताना उमेदवाराचा जन्म २९ डिसेंबर १९९९ ते २९ जून २००५ दरम्यान झालेला असावा. अग्निवीर भरती परीक्षेत निवडलेल्या अर्जदारांना PSL फेरीसाठी बोलावले जाणार असून दुसऱ्या टप्पयातील परीक्षा 01 डिसेंबर 2022 रोजी आयोजित केली जाणार आहे.

असा तपासा निकाल

स्टेप 1: निकाल तपासण्यासाठी उमेदवाराने सर्वप्रथम agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

स्टेप 2 : त्यानंतर होमपेजवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा

स्टेप 3: येथे फॉर्ममध्ये विचारलेली माहिती प्रविष्ट करून ती सबमिट करावी.

स्टेप 4 : वरील सर्व माहिती भरून झाल्यानंतर उमेदवारांना स्क्रीनवर दिसून येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT