देश

... तर कर्नाटकात ‘योगी मॉडेल’ लागू करणार : बसवराज बोम्मई

योगी आदित्यनाथ राज्यातील परिस्थितीच्या आधारावर उपाययोजना आखत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Basavaraj Bommai On Yogi Model : कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून जातीयवादी घटनांमध्ये वाढ झाली असून, अशा प्रकारच्या घटनांना वेळ पडल्यास आळा घालण्यासाठी योगी मॉडेल लागू केले जाईल असे विधान केले आहे. योगी आदित्यनाथ राज्यातील परिस्थितीच्या आधारावर उपाययोजना आखत आहेत. त्यामुळे कर्नाटकातदेखील तशा पद्धतीची गरज भासल्यास योगी मॉडेलचा अवलंब करावा लागेल. बोम्मई सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, केंद्र सरकारला संघटनेवर बंदी घालावी लागली. याबाबत राज्य सरकारने सर्व आवश्यक अहवाल केंद्राला पाठवले असून, लवकरच केंद्र या संस्थेवर बंदी घालण्याबाबत निर्देश जारी करेल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रवीण नेट्टारे यांच्या हत्येबाबत बोम्मई बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकारने अशा घटनांवर कारवाई सुरू केली असून, हर्ष प्रकरणात २४ तासांत कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. केजी हल्ली आणि डीजे हल्ली दंगल प्रकरणातही अशीच कारवाई सुरू झाली होती असे ते म्हणाले. घडणाऱ्या या घटनांवर बोलण्याऐवजी आम्ही कारवाई करण्यावर भर देऊ असे ते म्हणाले. सरकार कोणत्याही संघटित गुन्हेगारीला जातीय सलोखा बिघडवू देणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT