suicide drone sakal
देश

भारतीय लष्कराच्या मदतीसाठी आले सुसाईड ड्रोन, IIT कानपूरचे अनोखे संशोधन

IIT कानपूरने सुसाईड ड्रोन बनवले आहे.

Aishwarya Musale

IIT कानपूरने सुसाईड ड्रोन बनवले आहे. या ड्रोनमध्ये सहा किलोग्रॅम वजनाचे शस्त्र म्हणजेच स्फोटक बसवले जाऊ शकते. ते 100 किलोमीटरपर्यंतच्या शत्रूच्या तळावर हल्ला करू शकतात. एरोस्पेस विभागाचे सहाय्यक प्राध्यापक सुब्रमण्यम सदरला यांनी सांगितले की, यामध्ये स्टॉल्ड तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे. त्यामुळे शत्रूचे रडार हे ड्रोन पकडू शकत नाही.

पुढील सहा महिन्यांत टारगेट डिस्ट्रक्शन ट्रायल घेतल्या जातील. सदरला यांनी सांगितले की, आम्ही हे ड्रोन डीआरडीओच्या डीवायएसएल प्रकल्पांतर्गत गेल्या एक वर्षापासून तयार करत आहोत. हे कामिकाझे ड्रोन आहे.

त्याची लांबी सुमारे 2 मीटर आहे. ते फोल्ड करण्यायोग्य आहे. यात कॅमेरा आणि इन्फ्रारेड सेन्सर आहे. हे कॅनिस्टर किंवा कॅटपल्टमधून लॉन्च केले जाऊ शकते. हे ड्रोन आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने शत्रूचे टारगेट नष्ट करेल.

प्रो. सदराला यांनी सांगितले की, शत्रूने जीपीएस ब्लॉक केला तरी, पण हे ड्रोन शत्रूचे टारगेट पकडून ते नष्ट करेल. हे बॅटरीवर चालणारे सुसाइड ड्रोन आहे.

प्रक्षेपणानंतर 40 मिनिटांत ते शत्रूच्या 100 किलोमीटरच्या परिसरात घुसून प्रचंड विनाश घडवू शकते. हा काळ हाइब्रिड युद्धाचा काळ आहे. त्यामुळे प्रत्येक देशाला अशा सुसाइड ड्रोनची गरज आहे.

त्याची लवकरच वॉरहेडद्वारे चाचणी केली जाईल. ते किमान 100 मीटर आणि 4.5 किलोमीटर उंचीपर्यंत जाऊ शकते. त्याच्या मदतीने शत्रूवर कोणत्याही उंचीवरून हल्ला केला जाऊ शकतो. रात्रीच्या वेळीही हल्ला करू शकतो. हे ड्रोन बनवण्यासाठी डिफेन्स कॉरिडॉर अंतर्गत निधी मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT