corona cases in Delhi  sakal
देश

दिल्लीत एका दिवसात कोरोनाचा वेग दुप्पट; धोक्याचे संकेत

Corona update: दिल्लीतील 20 डिसेंबर 2021 ते 5 जानेवारी 2022 पर्यंतची आकडेवारी राजधानीत कोरोना रुग्ण संख्येत प्रचंड वाढ होत असल्याचे दर्शविते.

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीतील कोरोना प्रकरणे (Corona Cases in Delhi)-

राजधानी दिल्लीमध्ये झपाट्याने वाढणारी कोरोनाची प्रकरणे मोठ्या धोक्याचे (Danger) संकेत देत आहेत. दिल्लीचे आरोग्य मंत्री (Health Minister of Delhi) सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांनी सांगितले की, देशात कोरोनाची तिसरी लाट (Third Wave of Corona) आली असून दिल्लीत कोरोनाची पाचवी लाट आली आहे. ते म्हणाले की, आज दिल्लीमध्ये सुमारे 10,000 पॉझिटिव्ह केस (Corona Positive) येतील आणि पॉझिटिव्ह रेट (Positivity Rate) सुमारे 10% असेल, असं अंदाज आहे. मंगळवारी एक दिवस आधी, दिल्लीत कोविड -19 ची 5500 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि संसर्ग दर 8.5 टक्के नोंदवला गेला. कोविड-19 ची वाढती प्रकरणे पाहता वीकेंड कर्फ्यू लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

चिंतेची बाब अशी आहे की, इतक्या निर्बंधांनंतरही (restrictions) जर कोरोनाचे रुग्ण वाढले तर परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि लवकरच दैनंदिन रुग्णांची संख्या 1 लाखांपर्यंत पोहोचू शकते. सोमवारी दिल्लीत कोविड-19 चे 4,099 नवीन रुग्ण आढळले आणि संसर्गाचा दर 6.46 टक्के होता. याशिवाय एका रुग्णाचाही मृत्यू झाला. दिल्लीतील बहुतांश लोकसंख्या शहरी आहे. बाहेरून येणा-या लोकांची संख्याही इथे जास्त आहे, त्यामुळे संसर्गाचा धोकाही जास्त आहे.

तारीखनिहाय कोरोनाच्या केसेस आणि संसर्ग दर (Datewise Corona cases and infection rates)-

20 डिसेंबर 2021 - 91 रुग्ण - (0.20%)

21 डिसेंबर 2021 - 102 रुग्ण- (0.20%)

22 डिसेंबर 2021 - 125 रुग्ण- (0.20%)

23 डिसेंबर 2021 - 118 रुग्ण- (0.19%)

24 डिसेंबर 2021 - 180 रुग्ण- (0.29%)

25 डिसेंबर 2021 - 249 रुग्ण- (0.43%)

26 डिसेंबर 2021 - 290 रुग्ण- (0.55%)

27 डिसेंबर 2021 - 331 रुग्ण- (0.68%)

28 डिसेंबर 2021 - 496 रुग्ण- (0.89%)

29 डिसेंबर 2021 - 923 रुग्ण- (1.29%)

30 डिसेंबर 2021 - 1313 रुग्ण- (1.73%)

31 डिसेंबर 2021 - 1796 रुग्ण- (2.44%)

1 जानेवारी 2022 - 2716 रुग्ण- (3.64%)

2 जानेवारी 2022 - 3194 रुग्ण- (4.59%)

3 जानेवारी 2022- 4099 रुग्ण - (6.46%)

4 जानेवारी 2022- 5500 रुग्ण (8.5%)

5 जानेवारी 2022- 10,000-संभाव्य (10% संभाव्य)

दिल्लीतील 20 डिसेंबर 2021 ते 5 जानेवारी 2022 पर्यंतची ही आकडेवारी राजधानीत कोरोनाचे प्रकरण आणि संसर्गाचे प्रमाण कसे वाढत आहे हे दर्शविते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT