Viral Video 
देश

Goa : 'भारत माता की जय'चे नारे लावण्यास भाग पाडले; पाकला सपोर्ट करणे दुकानदाराला पडलं महागात

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - गोव्यातील कळंगुट येथील एका दुकानदाराला माफी मागण्यास भाग पाडल्याने आणि भारताच्या समर्थनार्थ घोषणा देण्यास भाग पाडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही लोकांच्या गटाने संबंधीत दुकानदाराला घोषणाबाजी आणि माफी मागण्यास भाग पाडलं. व्हिडिओत उत्तर गोव्यातील कळंगुट येथील दुकानमालक पाकिस्तान क्रिकेट संघाला पाठिंबा देतोय, अस दिसत आहे. कारण त्याचा परिसर मुस्लीम बहुल आहे.

जेव्हा हा व्हिडिओ बनवण्यात आला तेव्हा पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात क्रिकेट सामना सुरू होता. या व्हिडिओमध्ये असे दिसून आले की, व्लॉगरने त्या व्यक्तीशी थोडक्यात संभाषणही केले. यात व्लॉगर विचारतो की कोण खेळत आहे? तुम्ही न्यूझीलंडला पाठिंबा देत आहात का? यावर उत्तर देताना दुकानदार उत्तर देतो की, मी पाकिस्तानला पाठिंबा देत आहे. व्लॉगरने त्याला पुन्हा का विचारले. त्यावर त्यांनी आपला परिसर मुस्लीम असल्याचे उत्तर दिले.

हा व्हिडिओ व्हायरल होताच काही लोकांनी दुकानदाराकडे धाव घेतली आणि त्याला व्हिडिओबद्दल विचारणा करण्यास सुरुवात केली. लोकांनी त्याला माफी मागण्यास आणि 'भारत माता की जय' म्हणण्यास भाग पाडले. स्थानिक पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेबाबत अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT