देश

नियतीचा अजब खेळ, अपघातात चौघांचं हसतं-खेळतं कुटुंब संपलं

अपघात इतका भीषण होता की, ट्रक कारला अक्षरक्ष: काही मीटर अंतरापर्यंत फरफटत घेऊन गेला.

दीनानाथ परब

भोपाळ: मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात (Madhya pradesh satna district) बुधवारी रात्री भीषण अपघात (Accident) झाला. ट्रक (Truck) आणि कारच्या (Car) समोरासमोर झालेल्या धडकेत एका चौकोनी कुटुंबाचा दुर्देवी शेवट झाला. जोडप्याचा आणि त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रक कारला अक्षरक्ष: काही मीटर अंतरापर्यंत फरफटत घेऊन गेला.

चौघांचा चिरडून मृत्यू झाला. सत्यम उपाध्याय (४१), पत्नी मानिका (३८) आणि त्यांची दहा वर्षांची मुलगी इशानी यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा स्नेहने गुरुवारी सकाळी रुग्णालयात उपचारा दरम्यान प्राण सोडले. हे कुटुंब सतना शहरातून त्यांच्या घरी मायहार येथे चालले होते. तिथे उपाध्याय यांच मोबाइलचं दुकान आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

सतनामध्ये ते काही मित्रमंडळींना भेटले व ते फोटो सोशल मीडियावर शेअर केले. याच फोटोपैकी चौघे एकत्र जेवायला बसल्याचा फोटो आहे. हाच फोटो व्हायरल झाला असून हा त्यांचा शेवटचा फोटो असल्याचे बोलले जात आहे.

कार्यक्रम आटोपून हे कुटुंब कारने निघालं. अवघ्या पाच किमी अंतरावर गेल्यानंतर जीत नगर येथे ट्रकने धडक दिली. अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर फरार झाला होता. पण नंतर पोलिसांनी त्याला अटक केली. स्थानिक राजकरण्यांनी अपघातासाठी रस्ता बांधणाऱ्या कंपनीला दोष दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचाही यादीत समावेश; मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

Marathi News Live Updates: १७ डिसेंबरनंतर बघू, सरकारला जरांगे पाटलांचा थेट इशारा; तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुढची भूमिका काय?

Community Book Bank: ममदापुरात लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेत बुक बँक सुरू; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनाचे नवे दालन

SCROLL FOR NEXT