In Uttar Pradesh's Deoria, a woman threw boiling water on her husband after suspecting he was having an affair. Esakal
देश

Extra Marital Affair: बाहेरख्यालीपणाची आली शंका ओतलं उकळतं पाणी.. बायकोने नवऱ्याला चक्क टेरेसवरून खाली फेकलं

Affair: ते सासरवाडीला गेल्यावर सासरच्यांनी राहायचा आग्रह करत त्यांचा मोबाईल फोन आणि मोटरसायकलची चावी काढून घेतली.

आशुतोष मसगौंडे

उत्तर प्रदेशातील देवरियातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे आपल्या पतीचे प्रेमप्रकरण असल्याची शंका आल्याने एका महिलेने त्याच्यावर उकळते पाणी ओतत टेरेसवरून खाली फेकले.

उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितले की, त्यांनी एका महिलेला तिच्या झोपलेल्या पतीवर उकळते पाणी फेकत कुटुंबातील सदस्यांसोबत मिळून त्याला बेदम मारहाण केल्याबद्दल आणि टेरेसवरून ढकलल्याबद्दल अटक केली.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूरपासून अंदाजे 50 किमी अंतरावर असलेल्या देवरिया येथे 13 एप्रिल रोजी रात्री घडली.

सासरच्या मंडळींना भेटायला गेलेल्या या व्यक्तीला त्याच्या पत्नीने गरम पाणी फेकले आणि त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी हल्ला करत टेरेसवरून फेकले.

अमृता राय यांना पती आशिष कुमार राय यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. आशिष राय, मूळचे बालियाचे आहेत.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सासरवाडीला गेल्यावर सासरच्यांनी राहायचा आग्रह करत त्यांचा मोबाईल फोन आणि मोटरसायकलची चावी काढून घेतली. चावीसाठी विनंती करूनही, त्यांनी राहण्याचा आग्रह धरला. अखेर अशिष यांनी सासरच्यांची विनंती मान्य केली अन्नं तर सर्वजण झोपायला गेले.

आशिष राय यांनी पुढे सांगितले की, पहाटे ३ च्या सुमारास त्यांच्या पत्नीने तिला बाथरूमला जायचे असल्याचे सांगितले आणि स्वयंपाक घरात गेली. त्यांच्या नकळत, तिच्या बहिणीने उकळते पाणी तयार केले होते, जे तिने झोपलेल्यावर पतीवर ओतले.

यामुळे धक्का बसलेल्या अशिष यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी त्याला पकडले आणि त्याच्यावर शारिरीक हल्ला केला. मारहाण केल्यानंतर सासरच्यांनी अशिष यांना अखेर टेरेसवरून फेकून दिले.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या हल्ल्यात आशिष यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर त्याला पुढच्या उपचारांसाठी शहरातील महर्षी देवराह बाबा वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले.

अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी (१३ एप्रिल) आशिष त्याच्या पत्नीसह सासरवाडीला गेल्यानंतर ही घटना घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update:'मुळशीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस'; धरण ९९ टक्‍के भरले, आत्तापर्यंत एकुण ७४२८ मिमी पाऊस

Pune Rain Update:'भोर तालुक्यातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस'; वरंधा घाटातील महाड हद्दीत दरड कोसळली, वाहतूक बंद

Ganesh Chaturthi 2025: यंदा गणेश चतुर्थीला करा 'या' 10 खास गोष्टी, घरात पसरेल आनंदाची लाट

Chiplun Flood News : चिपळूण, राजापूर, खेडमध्ये दुकानांसह घरांत पाणी, पाच नद्या वाहताहेत धोक्याच्या पातळीवर

Taj Mahal Video: ताजमहालच्या तळघरात नेमकं काय आहे? कायम बंद असलेल्या गूढ खोलीत शिरला तरुण, व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT