Tejas-Express 
देश

Video : 'तेजस एक्‍सप्रेस'चा दिमाखदार थाट एकदा पाहाच!

वृत्तसंस्था

अहमदाबाद : देशातील दुसऱ्या खासगी तेजस एक्‍स्प्रेसचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता.17) झाले. अहदाबाद-मुंबई मार्गावर धावणाऱ्या या आरामदायी गाडीला गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी शुक्रवारी (ता.17) सकाळी हिरवा झेंडा दाखविला. 

मुंबई मध्य मार्गावरील 'तेजस'मधून प्रवाशांना रविवारपासून प्रवास करता येणार आहे. रेल्वेच्या 'इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरटीसीसी) या उपकंपनीतर्फे ही रेल्वे चालविली जाते. देशातील पहिली तेजस एक्‍स्प्रेस रेल्वे दिल्ली-लखनौ मार्गावर गेल्या वर्षापासून सुरू आहे. तेजस एक्‍स्प्रेस सर्व अत्याधुनिक सुविधा आहे. देशभरात अशा 150 गाड्या सुरू करण्याचे रेल्वे मंत्रालयाचे नियोजन आहे. 

उद्‌घाटनानिमित्त आज अहमदाबाद स्थानक फुलांनी सजविलेले होते. फलाटावर सुरू असलेल्या परंपरागत संगीत आणि नृत्याच्या साथीत आज सकाळी 10 वाजून 43 मिनिटांनी या रेल्वेने मुंबईकडे कूच केले. सुमारे 500 किलोमीटर अंतर साडेसहा तासांत कापत 'तेजस' सायंकाळी सहाच्या सुमारास मुंबई सेंट्रलला पोचली. उद्‌घाटन कार्यक्रमाला रेल्वेमंत्री पीयूष गोयल उपस्थित राहणार होते. मात्र, खराब हवामानामुळे ते येऊ शकले नाहीत, असे भाजपचे खासदार किरीट सोलंकी यांनी सांगितले. 

देशातील दुसरी तेजस एक्‍स्प्रेस ही मध्यम वेगवान रेल्वे अहमदाबाद- मुंबई या मार्गावर धावणार असून, त्याचे उद्‌घाटन करणे ही अभिमानाची बाब आहे. यामुळे दोन्ही राज्यांचा फायदा होणार आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावरील बुलेट ट्रेनचे कामही वेगाने सुरू आहे. 
- विजय रुपानी, गुजरातचे मुख्यमंत्री 

अशी आहे 'तेजस' 

-82902/82901 गाडी क्रमांक 
-आठवड्यातून सहा दिवस धावणार 
- प्रत्येक गुरुवारी देखभालीसाठी बंद 
- संपूर्ण वातानाकूलित गाडी 
- ऑनलाइन आरक्षण 60 दिवसांआधी शक्‍य 
- रेल्वेत भोजनसेवा उपलब्ध 
- चहा -कॉफीसाठी व्हेंडिंग मशीनची सोय 
- वाचण्यासाठी दिवा, मोबाईल चार्जिंग, एलईडी टीव्ही संच 
- डब्यात सीसी टीव्ही कॅमेरे, पर्यावरणपूरक स्वच्छतागृह, स्वंयचलित दरवाजे 

आसन क्षमता :
736 - एकूण प्रवासी क्षमता 

56 आसने - दोन एक्‍झिक्‍युटिव्ह डबे 

78 आसने - आठ डबे 

विलंब शुल्क (प्रत्येक प्रवाशामागे) :

- एक तास उशीर झाल्यास : 100 रु. 

- दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास : 250 रु.

प्रस्थान आणि आगमन वेळ : 

सकाळी 6. 40 : अहमदाबादहून प्रस्थान 

दुपारी 1.10 : मुंबई सेंट्रलला त्याच दिवशी आगमन 

दुपारी 3.40 : मुंबई सेंट्रलहून सुटणार 

रात्री 9. 55 : अहमदाबादला पोचणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT