Rahul-Gandhi 
देश

कोरोनाविरुद्धची लढाई कमकुवत करण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न; भाजपनेत्याचा पलटवार

सकाळवृत्तसेवा

दिल्ली - लॉकडाउनचे चार टप्पे पूर्ण होत आहेत. मात्र, कोरोनाचा संसर्ग अजूनही वाढत आहे. त्यामुळे देशावर लादण्यात आलेला लॉकडाऊन पूर्णपणे अपयशी ठरला आहे, असं म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. गांधींच्या या वक्तव्यावरुन भाजपने त्यांचा समाचार घेतला आहे. कोरोना विरुद्ध देश लढत असलेली लढाई राहुल गांधी कमकुवत करत आहेत, असं म्हणत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी निशाणा साधला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

जेव्हापासून कोरोनासारखी भयंकर परिस्थिती उद्भवलेली आहे तेव्हापासून राहुल गांधी सुरु असलेल्या लढाईला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. लॉकडाउन हे covid-19 ला रोखण्यासाठी प्रभावी नाही, असं राहुल गांधी यापूर्वी म्हणत होते. मात्र, पंजाब, राजस्थानमध्ये लॉकडाउन सर्वात आधी लावण्यात आला. महाराष्ट्रात लॉकडाउन 31 मेपर्यंत वाढवण्यात आला. त्यावेळी राहुल गांधींनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांना लॉकडाउनबाबत प्रश्न विचारले का, असा सवाल प्रसाद यांनी केला आहे.

श्रमीक मजुरांसाठी सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वेच्या तिकीटाबाबतही राहुल गांधी खोटं बोलत आहे. केंद्र सरकारने मजुरांकडून तिकीटाचे पैसे आकारले नाहीत. केंद्र सरकारने 85 टक्के तर राज्य सरकारने 15 टक्क्यांचा भार यात सोसला आहे. मात्र, गांधी याबाबतही खोटं बोलत आहेत, असं रविशंकर प्रसाद पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

नकारात्मक बोलणे, संकटाच्या वेळी राष्ट्राच्या विरुद्ध काम करणे, श्रेय लाटणे, बोलणं एक आणि करणं एक आणि चुकीच्या बातम्या पसरवणे अशा पाच गोष्टी करुन राहुल गांधी यांनी देशाला कमकुवत करण्याचे काम केले, असंही रविशंकर प्रसाद म्हणाले आहेत.

जगात असे पंधरा देश आहेत जेथे कोरोना मोठे संकट बनले आहे. या देशांची एकूण लोकसंख्या 142 कोटी आहे. यात अमेरिका, कनाडा, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, इटली अशा देशांचा समावेश होतो. या देशात 26 मेपर्यंत 3.43 लाख लोकांचा जीव गेला आहे. भारताची लोकसंख्या 137 कोटी आहे, पण भारतात आतापर्यंत 4335 लोकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळीच लावलेल्या लॉकडाऊनचा हा परिणाम आहे, असं प्रसाद म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti Uddhav Thackeray meeting : उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टींच्या भेटीमागे दडलय काय?, यासाठी शेट्टींनी दिली ठाकरेंना हाक

US-इराण युद्धात लहानसा देश मालामाल, होर्मुझ बंदचा फायदा; एका जहाजासाठी मिळतायत ३३ कोटी

Satara Gram Panchayat Elections : 874 ग्रामपंचायतींची रणधुमाळी लांबणीवर? मे-जूनमध्ये निवडणूक होणे का आहे अशक्य? प्रशासकीय हालचालींना वेग

UP: ‘काला नमक’ तांदूळ परदेशात सुपरहिट! 400 रुपये किलोने सिंगापूरमध्ये विक्री, भगवान बुद्धांशी खास कनेक्शन!?

Online Gaming Rules : 1 मे पासून 'या' ऑनलाइन गेम्सवर बंदी; एक चूक अन् थेट कारवाई, कोणाला मिळणार सूट? सरकारचा मोठा निर्णय पाहा

SCROLL FOR NEXT