Income Tax Raid on Former IPS officer House e sakal
देश

नोटांनी खचाखच भरलेले लॉकर, माजी IPS अधिकाऱ्याच्या घरी छापेमारी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काळा पैसा साठवून ठेवणाऱ्यांवर सध्या आयकर विभागाची (Income Tax) करडी नजर आहे. एका माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या घरावर आयकर विभागानं छापेमारी (Income Tax Raid on Former IPS Officer) केली. यावेळी अधिकाऱ्याच्या घरी बेसमेंटमध्ये तब्बल ६५० लॉकर असल्याचं आढळून आलं. त्यांच्या घरून कोट्यवधी रुपये जप्त केले आहेत.

आर. एन. सिंह असं या माजी आयपीएस अधिकाऱ्याचं नाव आहे. ते उत्तर प्रदेश कॅडरचे आयपीएस होते. त्यांचा मुलगा नोएडामध्ये एक खासगी लॉकर फर्म चालवतो. घरचे लॉकर हे किरायाने दिले जातात. याठिकाणी काळा पैसा असल्याची गुप्त माहिती आयकर विभागाला मिळाली होती. त्यानंतर आय़कर विभागाने माजी आयपीएस अधिकऱ्याच्या घरी छापेमारी केली. यावेळी त्यांच्या घराच्या बेसमेंटमध्ये तब्बल ६५० लॉकर असल्याचं आढळून आलं. यामध्ये कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत. पण, हा पैसा नेमका कोणाचा आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

आमचे फक्त दोन लॉकर -

आरएन सिंह हे युपीचे डीजी सुद्धा होते. घरातील ६५० लॉकरपैकी आमचे फक्त दोन लॉकर आहेत. मात्र, त्यामधून काहीही सापडलं नाही. मी माझ्या गावाला होतो. मात्र, आयकर विभागाची छापेमारी झाल्याची बातमी कळताच नोएडाला आलो. मी एक आयपीएस अधिकारी होतो. माझा मुलगा या घरात राहतो आणि तो खासगी लॉकर फर्म चालवतो, असं आर. एन. सिंह यांनी छापेमारीदरम्यान सांगितलं.

माझा मुलगा लॉकर सुविधेमध्ये बँकेपेक्षा चांगली सुविधा देतो. जवळपास सर्वच लॉकरची तपासणी पूर्ण झाली असून आमच्याकडे सर्व कागदपत्र आहेत, असंही आर. एन. सिंह म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: इंडिया अलायन्सचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT