Kharif crop 
देश

खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ; पाहा संपूर्ण यादी

केंद्रीय मंत्रिमडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं चालू खरीप विपणन हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ केली आहे. विविध पिकांप्रमाणं या किंमतीत ५० टक्के ते ६२ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. आर्थिक प्रकरणांच्या मंत्रिमंडळ समितीनं २०२१-२२ या पीक वर्षासाठी बुधवारी हा निर्णय घेतला. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही माहिती दिली. (Increase in MSP of kharip crops by 50 to 62 perc this year)

या नव्या MSP नुसार, तीळासाठी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सर्वाधिक किंमत निश्चित करण्यात आली आहे, जी ४५२ रुपये प्रतिक्विंटल इतकी आहे. त्याखालोखाल तूर आणि उडीदसाठी ३०० रुपये प्रतिक्विंटल इतकी किंमत निश्चित करण्यात आली आहे. तर भातपिकासाठी ७२ रुपये ते १,९४० रुपये प्रति क्विंटल इतकी MSP निश्चित करण्यात आली आहे. गेल्यावर्षी भातासाठीची MSP १,८६८ इतका होता.

भूईमूग आणि तेल बियांसाठी अनुक्रमे २७५ रुपये आणि २३५ रुपये प्रतिक्विंटल MSP निश्चित करण्यात आला आहे. विविध प्रकारची पिकं घेण्याला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारच्या खरीप पिकांसाठी विविध MSP निश्चित करण्यात आल्या आहेत, असं कृषीमंत्री तोमर यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT