Onion Prices Hike esakal
देश

Onion Prices Hike : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कांद्याचा दर वधारला; जुना कांदा 5,500 तर नवीन 4,500 रुपये

कर्नाटकातील नवीन कांद्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातील कांदा असलेल्या पट्ट्यात पडलेल्या पावसामुळे कांदा दरात मोठी वाढ झाली आहे.

बेळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत (Krushi Utpanna Bazar Samiti APMC) बाजाराच्या दिवशी महाराष्ट्रातील जुन्या कांदा दरात प्रतिक्विंटल १५००, तर कर्नाटकातील नवीन कांद्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली. जुना कांदा चार ते पाच हजार ५०० तसेच नवीन कांद्याचा तीन ते ४५०० हजार रुपये दर होता.

बुधवारी (ता. २९) बाजारात कांद्याच्या ८० गाड्यांची आवक झाली होती. रविवारी (ता.२६) पुणे, नाशिक, नगर या भागात झालेल्या पावसामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी झाली असून, दरात मोठी वाढ पाहायला मिळाली.

बाजारात नवीन कांद्याच्या ६० व जुन्या कांद्याच्या २० गाड्यांची आवक झाली होती. जुना लहान कांदा चार ते ४५०० रुपये, मध्यम कांदा ४५०० ते ४८०० व मोठा कांद्याचा ४८०० ते ५५०० रुपये दर होता. बागलकोट, विजापूर आदी भागातील नवीन लहान कांद्याला ३ हजार ते ३५०० रुपये, मध्यम कांदा ३५०० ते ४ हजार रुपये व मोठा कांदा ४ हजार ते ४५०० रुपये दराने उपलब्ध होता.

महाराष्ट्रातील कांदा असलेल्या पट्ट्यात पडलेल्या पावसामुळे कांदा दरात मोठी वाढ झाली आहे. आगामी काळात महिनाभरात बाजारपेठेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. नवीन कांद्याला पावसाचा फटका बसल्यामुळे जुन्या कांद्याला मागणी वाढली आहे. सुमारे महिनाभर कांदा दर ५,५०० च्या घरात होता. मात्र, गेले दोन आठवडे दर खाली घसरला. ३५०० ते चार हजारपर्यंत दर पोहोचला होता. मात्र, बुधवारच्या बाजारात दराने पुन्हा भरारी घेतली आहे.

रताळ्यांची ५० हजार पिशव्यांची आवक

बाजारात स्थानिक, इंदूर व आग्रा बटाटे दाखल झाले होते. स्थानिक बटाट्याच्या सुमारे तीन हजार पिशव्या दाखल झाल्या होत्या. या बटाट्याला १८०० ते २४०० रुपये दर मिळाला. सद्यस्थितीत शेतकरी बी-बियाण्यांसाठी हा बटाटा खरेदी करीत आहेत. पुढील पंधरा दिवसांपासून बटाटा लागवड होणार आहे. इंदूर बटाट्याच्या दोन गाड्या दाखल झाल्या होत्या. या बटाट्याला १८०० ते २१०० रुपये दर होता.

आग्रा बटाट्याच्या ४ गाड्या दाखल झाल्या असून १४०० ते १८०० रुपये दर होता. याचबरोबर एपीएमसीत सुमारे ५० हजार पिशव्यांची रताळ्यांची आवक झाली होती. त्याचा दर ४०० ते १२०० रुपये होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT