देश

Independence Day 2023: स्वातंत्र्याच्या जवळपास २६ वर्षे आधी तयार होता तिरंगा; राष्ट्रध्वजाबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

हा फक्त एक साधा झेंडा नाही, तर कोट्यवधी देशवासियांची शान आहे.

वैष्णवी कारंजकर

आपल्या भारत देशामध्ये विविध भाषा, धर्म, जात, प्रांत आहेत. पण आपल्या राष्ट्रध्वजासमोर तिरंग्यासमोर प्रत्येक भारतीय गौरवाने आणि अभिमानाने उभा राहतो आणि सलाम करतो. तिरंगा फडकवल्यावर भारतीयांच्या अंगात जोश संचारतो आणि अंगावर रोमांच उभे राहतात. हा फक्त एक साधा झेंडा नाही, तर कोट्यवधी देशवासियांची शान आहे. यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जाणून घेऊया आपला राष्ट्रध्वज तिरंग्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी.

भारतीय राष्ट्रीय ध्वजाचा इतिहास

भारताचा राष्ट्रीय ध्वजाला तिरंगा म्हणून ओळखलं जातं. याचं कारण म्हणजे यामध्ये असलेले तीन रंग. २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेच्या झालेल्या बैठकीमध्ये या ध्वजाचा स्विकार करण्यात आला. पण याच्या आधी १९२१ मध्ये आंध्रप्रदेशातल्या पिंगली व्यंकय्या यांनी देशाच्या एकतेचं प्रदर्शन करणाऱ्या तिरंग्याला तयार केलं होतं.

त्यावेळी तिरंग्यामध्ये केशरी रंगाऐवजी लाल रंग होता. लाल रंग हिंदू, हिरवा रंग मुस्लिम आणि पांढरा रंग इतर धर्मांचं प्रतिक आहे, असं मानलं गेलं होतं. प्रगतीचं प्रतिक म्हणून चरखाही या झेंड्यामध्ये होता. १९३१ पासून या झेंड्यातून लाल रंग काढून केशरी रंग वापरण्यात आला होता.

सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फडकला होता तिरंगा

ब्रिटीशांपासून स्वातंत्र्य मिळण्याच्या काही दिवस आधी २२ जुलै १९४७ रोजी भारतीय संविधान सभेच्या बैठकीत तिरंग्याला अधिकृतपणे राष्ट्रीय ध्वज म्हणून घोषित करण्यात आलं. १५ ऑगस्ट १९४७ आणि २६ जानेवारी १९५० आणि त्यानंतर भारतामध्ये तिरंगा हा शब्द भारतीय राष्ट्रीय ध्वजासाठी वापरला जातो. हा तिरंगा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यदिनी पहिल्यांदा लाल किल्ल्यावर फडकावला होता.

राष्ट्रध्वजाची लांबी रुंदी आणि रंग

भारताच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये तीन रंग आहे. सर्वात वर केशरी रंग, मधे पांढरा रंग आणि सर्वात खाली हिरवा रंग समान प्रमाणात आणि आकारात आहे. झेंड्याची रुंदी आणि लांबी 2:3 अशा प्रमाणात असते. पांढऱ्या पट्टीच्या मध्यभागी गडद निळ्या रंगाचं चक्र आहे. या चक्रामध्ये २४ आरे आहेत.

झेंड्याचा रंग

भारताच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये सर्वात वर केशरी रंग आहे. हा रंग देशाची ताकद आणि शौर्याचं प्रतिक आहे. मधे असलेला पांढरा रंग शांती आणि सत्याचा संदेश दिला जातो. शेवटची पट्टी ही हिरव्या रंगाची आहे. हा रंग समृद्धी आणि भरभराटीचं प्रतिक आहे.

चक्र

तिरंग्यावर मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर असलेल्या चक्राला अशोकचक्र असंही म्हटलं जातं. तिसऱ्या शतकात इसवीसन पूर्व काळात मौर्य सम्राट अशोक याने सारनाथमध्ये व्हील ऑफ द लॉ म्हणजे धर्मचक्र म्हणून हे चक्र तयार केलं होतं. या चक्राचा अर्थ असा आहे की गतीमध्ये जीवन आहे आणि स्थैर्यामध्ये मृत्यू आहे.

फ्लॅग कोड ऑफ इंडिया, २००२

२६ जानेवारी २००२ रोजी भारतीय ध्वज संहिता लागू करण्यात आली आणि स्वातंत्र्यानंतर कितीतरी वर्षांनी भारताच्या नागरिकांना कोणत्याही दिवशी, आपल्या घरामध्ये, ऑफिसेसमध्ये, कारखान्यांवर भारतीय ध्वज फडकवण्याची परवानगी मिळाली. आता भारतीय कुठेही आणि कोणत्याही वेळी राष्ट्रीय ध्वज फडकवू शकतात. मात्र तिरंग्याचा अपमान होणार नाही, अनादर होणार नाही, यासाठी संविधानामध्ये काही कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT