India census 2027 esakal
देश

कुटुंबात किती लोक? कोणत्या जातीचे आहात? आता संपूर्ण माहिती तुम्ही घरबसल्या सांगू शकणार; जनगणनेत दिसणार 'हा' पर्याय

India census 2027 : या वेळी नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन जनगणनेत भाग घेता येणार आहे. यासाठी लवकरच केंद्र सरकार एक अधिकृत जनगणना पोर्टल (Digital Census India) सुरू करणार आहे.

बाळकृष्ण मधाळे

India census 2027 : भारतात दर १० वर्षांनी जनगणना होण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा तब्बल १६ वर्षांनंतर २०२७ मध्ये जनगणना होणार आहे. ही विलंबित जनगणना असूनही, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ती अधिक सक्षम आणि पारदर्शक होणार आहे.

जनगणना घरबसल्या ऑनलाइन!

या वेळी नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन जनगणनेत भाग घेता येणार आहे. यासाठी लवकरच केंद्र सरकार एक अधिकृत जनगणना पोर्टल (Digital Census India) सुरू करणार आहे. या पोर्टलवर नागरिक स्वतःची नोंदणी करून, स्वतःच्या आणि संपूर्ण कुटुंबाच्या माहितीचा तपशील भरू शकतील.

या पद्धतीने मिळणार सुविधा

  • नागरिकांना प्रथम पोर्टलवर खाते तयार करावे लागेल.

  • त्यानंतर, घर व कुटुंबासंबंधित माहितीचे फॉर्म भरावे लागतील.

  • माहिती भरल्यानंतर ती सरकारी डेटामध्ये थेट नोंदवली जाईल.

रिअल टाइम डेटा अपलोड करणारे फील्ड कर्मचारी

ज्यांना स्वतः ऑनलाइन माहिती भरता येणार नाही, अशा नागरिकांसाठी घरोघरी जाणारे कर्मचारी मोबाइल अ‍ॅपच्या साहाय्याने डेटा गोळा करतील आणि तो रिअल टाइममध्ये सर्व्हरवर अपलोड केला जाईल. यामुळे माहिती गोळा करणे अधिक जलद होईल, डेटा विश्लेषण त्वरित करता येईल, तसेच प्रत्येक घरात कर्मचारी पोहोचले नाहीत, या तक्रारीही कमी होतील.

नोंदणी पद्धत आधार आणि मतदार यादीसारखीच

सूत्रांनुसार, ही ऑनलाइन प्रक्रिया आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्राशी लिंक असू शकते. नागरिकांना नोंदणी करताना त्यांचे नाव, पत्ता, आधार/ओळखपत्र क्रमांक देऊन प्रोफाइल तयार करावे लागेल.

दोन टप्प्यांमध्ये होणार माहिती संकलन

ही डिजिटल जनगणना दोन टप्प्यांत होणार आहे.

  • पहिला टप्पा : घरांची यादी, घराची स्थिती, मालकी वगैरे बाबींची माहिती

  • दुसरा टप्पा : घरातील व्यक्तींची माहिती, लिंग, वय, शिक्षण, व्यवसाय, जात इत्यादी तपशील

विशेष म्हणजे, ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा जातीवर आधारित जनगणना संपूर्ण देशात केली जाणार आहे.

उपलब्ध माहितीवर व्यापक विश्लेषण

या डिजिटल माध्यमातून गोळा झालेली माहिती त्वरित संगणकीय प्रणालीत समाविष्ट केली जाईल, त्यामुळे डेटा लवकर उपलब्ध होईल. तसेच शहर, राज्य, सामाजिक घटक यावर आधारित विश्लेषण करता येईल.

नागरिकांसाठी काय फायदे?

  • घरबसल्या सहभागाची संधी

  • डेटा भरताना अचूक आणि स्वतःच्या भाषेत माहिती देण्याचा पर्याय

  • कोणतेही प्रतिनिधी न आल्यासही माहिती नोंदवण्याची मुभा

  • पोर्टलद्वारे एकाचवेळी सर्व कुटुंबाची माहिती नोंदवता येणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupee Symbol: रुपयाचं चिन्ह कोणी डिझाइन केलं? दोन आर्किटेक्टची कहाणी; एकाला प्रसिद्धी मिळाली, तर दुसरा...

त्या एका घटनेनंतर राज ठाकरेंचे निलेश साबळेला तब्बल 17 मिस्डकॉल्स, असं काय घडलं होतं?

Gokul Milk Politics : ठिणगी पडली! गोकुळ दूध संघाच्या संचालकांची संख्या २१ वरून २५ करण्याचा निर्णय, शौमिका महाडिकांचा विरोध

Latest Maharashtra News Updates : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

Flood Video : मुसळधार पावसाचं थैमान! पुराच्या पाण्यात लोक गेले वाहून, पुढे जे झालं....; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT