Leaders of the I.N.D.I.A Alliance to announce their Vice President candidate, shaping the next phase of opposition politics. esakal
देश

I.N.D.I.A Alliance Vice President Election: विरोधकांच्या I.N.D.I.A आघाडीकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची आज घोषणा होणार?

I.N.D.I.A Alliance Vice President Candidate: जाणून घ्या, कोणती तीन नावे आहे चर्चेत? ; मल्लिकार्जुन खर्गेंच्या निवासस्थानी दुपारी महत्त्वपूर्ण बैठक होणार

Mayur Ratnaparkhe

Vice President Election Update: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए)  उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. सुरुवातासी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध होईल, असंच वाटत होतं. मात्र सध्या सुरू असणाऱ्या घडामोडी बघता आता इंडिया आघाडीकडूनही उमेदवार जाहीर केला जाणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, असे समोर येत आहे.

 इंडिया आघाडीकडून अद्यापपर्यंत उमेदवाराची घोषणा केली गेलेली नाही. परंतु काही नावं सध्या चर्चेत आहेत. दरम्यान  काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी आज दुपारी साडेबारा वाजता सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीनंतर उमेदवाराचे नाव अधिकृतपणे जाहीर केले जाईल अशी अपेक्षा आहे.

प्राप्त माहितीनुसार, इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी चर्चेत असणाऱ्या नावांमध्ये द्रमकचे राज्यसभा खासदार तिरुची शिवा,  चांद्रयान-१ प्रकल्पाचे नेतृत्व करणारे माजी इस्रो शास्त्रज्ञ मल्लस्वामी अन्नादुराई यांचे नाव समाविष्ट आहे. याशिवाय, महात्मा गांधींचे पणतू आणि इतिहासकार तुषार गांधी यांचे नावही सुरुवातीच्या चर्चेत आले आहे, जेणेकरून ही निवडणूक भाजपविरुद्ध वैचारिक संघर्ष म्हणून दाखवता येईल.

दरम्यान, एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याचा निर्णय  ११ खासदार असलेल्या वायएसआर काँग्रेस पक्षाने घेतला आहे. ज्यामुळे सत्ताधारी आघाडीला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणडणुकीसाठी बळकटी मिळाली आहे. या वृत्ताला दुजोरा देताना, वायएसआर काँग्रेसच्या खासदार मदिला गुरुमूर्ती म्हणाल्या की, त्यांच्या पक्षाने एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: पावसाने पुन्हा दाखवला ‘आपला जोर’! रेल्वे रुळांवर ११ इंच पाणी; प्रवासी अडकले अन् स्टेशनवर मोठी गर्दी

India Squad For Asia Cup 2025: आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर; सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील १५ शिलेदार, पूर्ण लिस्ट

China-India: चीनचे परराष्ट्र मंत्री दिल्लीहून इस्लामाबादला जाणार; नेमकं कारण काय?

Video : 'मी सांगितलेला होमवर्क केलास काय रे?' पंतप्रधान मोदींनी अंतराळवीर शुभांशु शुक्लांशी साधला संवाद, मिळालं एकदम भारी गिफ्ट..

Viral Video : प्रियकरासोबत जाण्याचा प्लॅन चॅटजीपीटी मुळे धुळीस; महिलेला कोसळले रडू, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT