ANI
देश

अमृत महोत्सवाची सुरुवात होताच मिळाली खूशखबर - PM मोदी

सकाळ डिजिटल टीम

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण असल्याच्या पार्श्वभूमीवर अमृत महोत्सव देशात साजरा करण्यात येत आहे.

नवी दिल्ली - देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण असल्याच्या पार्श्वभूमीवर अमृत महोत्सव देशात साजरा करण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या मन की बातच्या कार्यक्रमात मोदींनी अमृत महोत्सवाबाबत सांगितलं होतं. अमृत महोत्सव हा राजकीय कार्यक्रम नसून हा भारतीयांचा महोत्सव आहे. 'सध्या सुरु असलेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतीयांच्या दिमाखदार अशा कामगिरीने अमृत महोत्सव साजरा करताना आणखी उत्साह वाढवला आहे', असं मोदींनी ट्विटरवरून म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, ऑगस्टमध्ये अमृत महोत्सवाला सुरुवात होत आहे. प्रत्येक भारतीयाच्या हृदयाला भिडणाऱ्या अशा अनेक घटना घडत आहेत. देशात विक्रमी लसीकरण आणि जीएसटीचे विक्रमी संकलन ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होण्याचे संकेत मिळत आहेत.

ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या पीव्ही सिंधूसह भारताचे महिला आणि पुरुष हॉकी संघांनीसुद्धा ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यंदाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना 130 कोटी भारतीय नक्कीच या सोहळ्यानिमित्त भारताला आणखी उंचीवर नेतील असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला आहे.

मोदींनी मन की बात या आकाशवाणीवरील कार्यक्रमात सांगितलं होतं की, देश स्वांतंत्र्याच्या 75 व्या वर्षात पदार्पण करत आहे. हे आपलं भाग्य आहे की, ज्या स्वांतत्र्यासाठी देशाने बराच काळ संघर्ष केला, वाट पाहिली त्याला 75 वर्षे होत आहेत आणि त्याचे आपण साक्षीदार आहे. स्वातंत्र्यांची 75 वर्षे साजरी करण्याची सुरुवात ही 12 मार्चला साबरमती आश्रमातून झाली होती. तेव्हापासून जम्मू काश्मीर ते पुद्दुचेरी, गुजरात ते पुर्वोत्तर राज्यांमध्ये अमृत महोत्सवाशी संबंधित कार्यक्रम सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar News: 'लक्ष्मीपूजनासाठी दुपारी तीन वाजेपासून मुहूर्त'; अहिल्यानगर शहरात दिवाळी सणाचा उत्साह; घरोघरी मंगलमय वातावरण

Pakistan Cricket : पाकिस्तानची संगीत खुर्ची! मोहम्मद रिझवानचा 'करेक्ट कार्यक्रम' करून २५ वर्षीय खेळाडूला केलं कॅप्टन

'माझ्यात जी चमक आहे ती तमन्नामध्ये नाही' राखी सावंत तमन्नाबद्दल बोलताना म्हणाली...'आमच्या आयटम सॉन्गमध्ये घुसली आणि...'

Kolhapur CBS Rada : कोल्हापूर सीबीएसवर एसटी नसल्याने प्रवासी संतापले, जोरदार घोषणाबाजी; नेमकं काय प्रकरण

'गुप्तांगाला स्पर्श करणेही बलात्कारच'; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय; ड्रायव्हरने दोन मुलींवर केला होता अत्याचार

SCROLL FOR NEXT