India buys 60 crore corona vaccine in advance 
देश

Corona Vaccine: भारताने 60 कोटी लशींची केली खरेदी; आणखी 1 अब्ज लशींसाठी चर्चा सुरु

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: कोरोनावरील लशीची आस सध्या प्रत्येकाला लागली आहे. जगभरातील बऱ्याच देशांनी लस बाजारात येण्यापुर्वी लसनिर्मिती कंपनींकडून लशी विकत घेतल्या आहेत. यामध्ये भारतही मागे राहिला नाही, भारत सरकारने कोरोनाच्या तब्बल 60 कोटी लशींचं बूकींग करून त्याची प्री-ऑर्डर देऊन ठेवली आहे. तसेच अजून 100 कोटी लशी मिळण्यासाठी विविध कंपन्यांशी चर्चा सुरु असल्याची माहिती एडवांस मार्केट कमिटमेंट्सने दिली आहे.

तसेच जगभरात फक्त अमेरिका लस बूकींगच्या बाबतीत भारताच्या पुढे असल्याचे एडवांस मार्केट कमिटमेंट्सच्या एका जागतिक सर्वेक्षणात समोर आलं आहे. अमेरिकेने आतापर्यंत 81 कोटी कोरोनाच्या डोसची प्री-ऑर्डर देऊन ठेवली आहे. तसेच अमेरिका अजून 1.6 अब्ज डोस खरेदी करण्याची योजना आखत आहे. 

सर्वेनुसार जगभरातील विकसित आणि विकसनशील देशांनी 8 ऑक्टोबरपर्यंत 3.8 अब्ज कोरोना डोसची बूकींग करून ठेवली होती. तसेच अजून 5 अब्ज कोरोना डोसच्या खरेदीची चर्चा सुरु आहे.  

कुणी किती कोरोना डोस खरेदी केल्या-

नं देश किती लशींची बूकींग  अजून किती लशींसाठी चर्चा सुरु
1  भारत 60 कोटी 100 कोटी
2 अमेरिका 81 कोटी 1.6 अब्ज
3 युरोपियन युनियन 40 कोटी  1.565 अब्ज

कॅनडाने लोकसंख्येच्या पाचपट अधिक डोस बुक केले आहेत. युनायटेड किंग्डमने लोकसंख्येपेक्षा सुमारे अडीचपट अधिक लस खरेदी करण्याचा करार केला आहे. 

'बाबा का ढाबा' फेमस करणाऱ्या यू-ट्यूबर विरोधातच बाबांची पोलिसांत तक्रार; जाणून घ्या कारण
 
भारतातील कोरोनाच्या प्रभाव होतोय कमी-
देशात कोरोनाचा रुग्ण काही प्रमाणात कमी होताना दिसत आहेत. मागील 24 तासांत देशात कोरोनाने 496 जणांचा मृत्यू झाला असून 45 हजार 230 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत देशात 82 लाख 29 हजार 313 जणांना कोरोनाची बाधा होऊन 1 लाख 22 हजार 607 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT