India-China Troops Clashed
India-China Troops Clashed esakal
देश

मोठा धोका! तवांगनंतर 'या' भागांवर 'ड्रॅगन'ची करडी नजर; हल्ले वाढण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

गलवान संघर्षानंतर चीननं पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला आहे.

India-China Troops Clashed : गलवान संघर्षानंतर चीननं पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूचे जवान जखमी झाले आहेत.

जखमी झालेल्या भारतीय सैनिकांनी गुवाहाटीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर, दुसरीकडं भारतीय सैनिकांपेक्षा चिनी सैनिक मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याची माहिती एएनआयनं दिलीय. अरुणाचल प्रदेशातील तवांगनंतर चीन इतर भागातही हल्ला करू शकतं. चिनी सैन्याचे नापाक इरादे आता स्पष्टपणे दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, LAC वर दोन ते तीन ठिकाणी संघर्ष होण्याची शक्यता आहे. एलएसीवरील सर्व युनिट्सला ऑपरेशनल अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. पूर्व लडाखपासून अरुणाचलपर्यंत लष्कर अलर्ट स्थितीत आहे. चीन पुन्हा LAC वर हल्ला करू शकतो, त्यामुळं भारतीय जवान प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत.

सध्या चीन तवांग व्यतिरिक्त कुठंही हल्ला करू शकतो. तशी माहिती आता समोर येत आहे. चिनी सैन्य भौगोलिकदृष्ट्या मजबूत भागात तणाव निर्माण करू शकतं. तवांगमध्ये भारतीय लष्कर मजबूत स्थितीत आहे. बोफोर्स, हॉवित्झर सारख्या तोफा इथं आधीच तैनात आहेत. चीननं इथं काही केलं तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळंच आता ड्रेननची नजर अशा भागांवर आहे, जिथं लष्कराची उपस्थिती कमी आहे आणि त्याचा फायदा चीन घेऊ शकतं. सध्या तिन्ही सैन्यदल अलर्ट मोडवर आहेत.

भारतीय जवानांचं जोरदार प्रत्युत्तर

9 डिसेंबरला पीएलएच्या सैनिकांनी एलएसी गाठण्याचा प्रयत्न केला, त्याला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. समोरासमोर झालेल्या या चकमकीत दोन्ही बाजूचे काही जवान किरकोळ जखमी झाले आहेत. त्यानंतर लगेचच दोन्ही सैन्य आपापल्या जागेवर परतलं.

1987 मध्येही संघर्ष

1987 मध्येही या भागात भारत आणि चीन यांच्यात संघर्ष झाला होता. तवांगच्या उत्तरेकडील समदोरंग चू भागात ही चकमक झाली. 1986 च्या उन्हाळ्यात चीननं भारतीय समदोरंग चू या क्षेत्रात प्रवेश केला. भारतानं चीनला आपल्या सीमेवर परत जाण्यास सांगितलं, पण चीन मानायला तयार नव्हतं. भारतीय लष्करानं ऑपरेशन फाल्कन सुरू केलं.लडाखपासून सिक्कीमपर्यंत भारतीय लष्कर तैनात करण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात आली आणि लवकरच दोन्ही देशांमधील चर्चेतून प्रकरण शांत झालं. दरम्यान, 1987 मध्ये एकही हिंसाचार झाला नाही किंवा कोणीही मारलं गेलं नाही.

चीनला तवांगबद्दल काळजी

त्याचवेळी सुमारे 300 चिनी सैनिक पूर्ण तयारीनिशी आलं होतं, ज्यांचा भारतीय लष्करानं पाठलाग केला. संपूर्ण अरुणाचल प्रदेशावर चीन दावा करत असला तरी तवांगबाबत चीनला नेहमीच काळजी वाटत आली आहे. तवांगमध्ये बौद्ध धर्माची मुळं खूप खोलवर रुजली आहेत. सहाव्या दलाई लामा यांचं जन्मस्थान असल्यानं बौद्धांमध्ये तवांगचं स्वतःचं विशेष महत्त्व आहे. या आधारावर चीन तवांगला जवळ मानतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT