india china 
देश

चीनने आधी सैन्य मागे घ्यावं त्यानंतर पुढची चर्चा; 13 तासांच्या बैठकीत भारताचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - लडाखमधील तणाव वाढत असतानाच सोमवारी भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेली बैठक बराच वेळ चालली. यावेळी भारताकडून कठोर भूमिका घेण्यात आली होती. चीनने सर्व वादग्रस्त भागातून मागे हटावं अशी मागणी भारताने केली. तसंच पाऊल मागे घेण्यास चीनने सुरुवात करावी कारण वादही त्यांनीच वाढवला असंही भारताने या बैठकीत सांगितल्याचे समजते. तब्बल 13 तासांहून अधिक काळ ही बैठक सुरू होती. 

भारत आणि चीन यांच्यात झालेल्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यात लडाखमध्ये सीमेवर असलेल्या सर्व वादग्रस्त पॉइंटवरून चीनने त्यांचे सैन्य मागे घ्यावं अशी भूमिका भारताने घेतली आहे. तसंच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून दोन्हीकडून सैन्य मागे घेण्यासाठी एक रोडमॅप तयार करण्यात यावा. त्यानुसार पुढच्या हालचाली करता येतील. लडाखमधील वादाला सुरुवात चीनने केली होती. चीनकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. अशा परिस्थितीत सैन्य मागे घ्यायचं असेल तर सुरुवात चीनने करावी त्यानंतर भारतही सैनिकांना परत बोलावेल असंही सांगण्यात आलं.

पेगाँग त्सो फिंगर भागातून चीनने तात्काळ सैन्य मागे घ्यावं असं भारताने स्पष्ट सांगितलं आहे. याशिवाय हॉटस्प्रिंग, देपसांग मुद्द्यावरही भारताने प्रश्न उपस्थित केले. बैठकीला सुरुवात सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास झाली होती ती रात्री उशिरापर्यंत चालली. आता मंगळवारी पुन्हा एकदा दोन्ही देशाचे अधिकारी पुन्हा चर्चा करतील असं म्हटलं जात आहे. या वादाला सोडवण्यासाठी चर्चा करण्याचा प्रयत्न सुरु राहील.

भारताने चीनला स्पष्ट इशारा दिला आहे की, चीन पूर्णपणे माघार घेण्यास आणि परिस्थिती पूर्ववत करण्याची तयार नसेल तर भारत लाँग हॉलसाठी सज्ज आहे. हिवाळ्यातसुद्धा सीमेवर तैनात होण्यासाठी सैन्य तयार असल्याचं भारताने म्हटंल आहे. 

गेल्या काही दिवसात भारताने चीनच्या काही टेकड्यांवर ताबा मिळवला आहे. युद्धाच्या दृष्टीने या टेकड्या महत्वाच्या आहेत. एवढंच नाही तर आता या वादात भारताची बाजू मजबूत झाली असून चीनला थेट इशारा दिला जात आहे. चीनसोबतचा तणाव मे महिन्यापासून सुरु असून तो ऑगस्टमध्ये वाढला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

SCROLL FOR NEXT