देश

देशात कोरोनामुक्तांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी जास्त

सूरज यादव

भारतात कोरोनामुक्तांची संख्या दोन कोटींच्यावर पोहोचली असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण हे 83 टक्क्यांहून जास्त झाले आहे.

देशात कोरोनाच्या (India Corona Update) दुसऱ्या लाटेनं कहर केला आहे. दरदिवशी तीन लाखांहून अधिक रुग्ण आणि चार हजारांहून जास्त मृत्यू होत आहेत. मात्र गेल्या दोन दिवसात सलग कोरोनामुक्तांची (Discharge Patient) संख्या नव्या रुग्णांपेक्षा जास्त आहे. शुक्रवारी भारतात 3 लाख 26 हजार 98 नवीन रुग्ण सापडले. तर 3 लाख 53 हजार 299 जण कोरोनामुक्त झाले. तर गेल्या 24 तासात 3 हजार 890 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत भारतात एकूण 2 कोटी 43 लाख 72 हजार 907 जणांना कोरोनाची लागण झाली असून 2 कोटी 4 लाख 32 हजार 898 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 2 लाख 66 हजार 207 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. सध्या देशात 36 लाख 73 हजार 802 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

मे महिन्यात एका दिवसात आढळणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. देशात 6 मे रोजी सर्वाधिक 4 लाख 14 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर नव्या रुग्णांची संख्या कमी होत असून आता ती सव्वा तीन लाखांवर आली आहे. गेल्या 15 दिवसात शुक्रवारी आढळलेली रुग्णसंख्या ही सर्वात कमी असून दुसरी लाट ओसरत असल्याचं दिसत आहे.

भारतात शुक्रवारी एका दिवसात 16 लाख 93 हजार 93 जणांची कोरोना चाचणी (Corona Test) करण्यात आली. आतापर्यंत देशात 31 कोटी 30 लाख 17 हजार 193 कोरोना टेस्ट झाल्या असल्याची माहिती आयसीएमआरने (ICMR) दिली आहे. दुसऱ्या लाटेत पुन्हा एकदा कोरोना चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. (india corona update 15 may 2021 new cases and death)

गुरुवारी देशात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त होती. तर दिवसभरात 3 लाख 44 हजार जण मुक्त होताच एकूण कोरोनामुक्तांचा दोन कोटींचा टप्पाही भारताने पार केला. देशात कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या दोन कोटींच्यावर पोहोचली असून रुग्ण बरे होण्याचा दर 83.50 टक्के इतका झाला आहे.

भारतात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 79.9 टक्के रुग्ण हे बारा राज्यांत आहेत. आतापर्यंत 18 कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासांत 18-44 वर्षे वयोगटाच्या 4 लाख 40 हजार 706 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्यामध्ये 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 39 लाख 26 हजार 334 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. देशातील मृतांच्या संख्येपैकी 72.70 टक्के मृत्यू हे दहा राज्यात आहेत. महाराष्ट्रात आणि कर्नाटकात हे प्रमाण जास्त आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "नरेंद्र मोदींना मी इस्त्राइलला घेऊन गेलो होतो"; शरद पवारांनी संपूर्ण इतिहास काढला

Astronomers: खगोलशास्त्रज्ञांनी 55 प्रकाशवर्षे दूर पृथ्वीच्या आकाराचा एक नवीन ग्रहाचा लावला शोध

Sunil Chhetri : हा माझा अखेरचा सामना असेल... भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्रीने अचानक घेतली निवृत्ती, भावुक Video केला शेअर

Jr NTR: ज्युनियर एनटीआरचं होतंय कौतुक; वाढदिवसाच्या आधी इतके पैसे मंदिराला केले दान

Maharashtra Politics: 4 जूननंतर पुन्हा खेला होबे? शरद पवार गट, ठाकरेंचा गट फुटणार असल्याचा भाजप नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT