Corona
Corona esakal
देश

Corona Update - देशात गेल्या 24 तासात मृत्यूचा उच्चांक

सकाळ डिजिटल टीम

दिलासा देणारी गोष्ट म्हणजे भारतात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. गेल्या 24 तासात 3 लाख 55 हजार 338 जण कोरोनामुक्त झाले.

नवी दिल्ली - देशात कोरोनाची (India Corona Update) रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृत्यूचे प्रमाण वाढलं आहे. सोमवारी देशात 3 लाख 29 हजार नवीन रुग्ण (New Covid Cases in India) सापडले होते. मंगळवारी त्यात वाढ झाली असून दिवसभरात 3 लाख 48 हजार 421 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासात 4 हजार 205 मृत्यू झाले असून आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. देशात याआधी 7 मे रोजी एकाच दिवशी 4 हजार 187 इतक्या मृत्यूची नोंद झाली होती.

आतापर्यंत देशात कोरोनामुळे 2 लाख 54 हजार 197 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात (India) एकूण 2 कोटी 33 लाख 40 हजार 938 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 93 लाख 82 हजार 642 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या देशात 37 लाख 4 हजार 99 जण कोरोनावर उपचार घेत आहेत. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे भारतात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. गेल्या 24 तासात 3 लाख 55 हजार 338 जण कोरोनामुक्त झाले. (India Corona Update highest death in one day due to covid 19)

सक्रीय रुग्णांच्या बाबतीत कर्नाटकने महाराष्ट्राला मागे टाकले आहे. कर्नाटकात 5 लाख 87 हजार 452 कोरोनाचे रुग्ण आहेत तर महाराष्ट्रात हीच संख्या 5 लाख 58 हजार 996 इतकी आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 40 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 793 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 71 हजार 966 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत राज्यात 77 हजार 191 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

भारतात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून आंध्र प्रदेशमध्ये ऑक्सिजन वेळेत न पोहोचल्यानं 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता गोव्यातही ऑक्सिजन पुरवठा खंडीत झाल्यानं 4 तासात 26 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक राज्यांसह केंद्र शासित प्रदेशात नवीन रुग्ण आढळण्याचं प्रमाण कमी होत आहे. यामुळे केंद्र सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. तर सरकारने आता टेस्टिंगबाबतच्या नियमातही काही बदल केले आहे. यानुसार आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याआधी आरटीपीसीआर टेस्टची गरज पडणार नाही. याआधी अनेक राज्यांनी इतर राज्यातून येणाऱ्यांसाठी कोरोना टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक केला होता. याशिवाय नवीन गाइडलाइननुसार जर रुग्णाला पाच दिवसापासून ताप नसेल तर रुग्णालयातून घरी सोडण्याआधीही आरटीपीसीआर टेस्टची गरज नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: कर्नाटकात 28 जागांपैकी आम्ही 25 जागा जिंकणार- बीएस येडियुरप्पा

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

SCROLL FOR NEXT