ANI
ANI
देश

देशात ओमिक्रॉनचे 1525 रुग्ण; २४ तासात 27 हजार नवे कोरोनाबाधित

सकाळ डिजिटल टीम

आतापर्यंत सर्वाधिक महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या ४६० रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्याखालोखाल दिल्लीत ३५१ ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.

भारतात (India) कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. गेल्या २४ तासात देशात तब्बल २७ हजार ५५३ नवे रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात २८४ जणांचा मृत्यू झाला आहे. वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रॉन व्हेरिअंटच्या (Omicron Variant) रुग्णांची संख्या १५२५ इतकी झाली आहे. यात सर्वाधिक महाराष्ट्रात (Maharashtra) ४६० रुग्णांची नोंद आहे. तर त्याखालोखाल दिल्लीत (Delhi) ३५१ ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले. गुजरात, तामिळनाडु, केरळमध्ये ओमिक्रॉनचे प्रत्येकी १०० हून अधिक रुग्ण आहेत.

देशातील एकूण १५२५ ओमिक्रॉन बाधितांपैकी ५६० जण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमध्ये नाइट कर्फ्यू लागू आहे. तर महाराष्ट्रात काही निर्बंधसुद्धा लागू केले आहेत.

भारतात आतापर्यंत ३ कोटी ४२ लाख ८४ हजार ५६१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४ लाख ८१ हजार ७७० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात १ लाख २२ हजार ८०१ जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT