देश

चढउतार! 24 तासात 2.76 लाख नवीन रुग्ण, 3874 मृत्यू

नामदेव कुंभार

Coronavirus Cases in India Today : भारतामध्ये कोरोना रुग्णांच्या आणि मृताची संख्येत स्थिरता दिसत नाही. रुग्ण आणि मृताच्या संख्येत चढउतार दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रायानं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, बुधवारी देशात दोन लाख 76 हजार 110 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर तीन हजार 874 जणांचा मृत्यू झालाय. याच कालावधीत तीन लाख 69 हजार 77 जणांनी कोरोनावर मात केली. याआधी मंगळवारी 2.67 लाख, सोमवारी 2.63 नवीन कोरोना रुग्ण आढळले होते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपर्यंत देशभरात 18 कोटी 70 लाख 9 हजार 792 कोरोना डोस देण्यात आले आहेत. बुधवारी देशभरात 11 लाख 66 हजार 90 जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. देशात आतापर्यंत 32 कोटीपेक्षा जास्त जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. बुधवारी जवळपास 20 लाख कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. कोरोना पॉझिटिव्ह दर 13 टक्के जास्त आहे.

देशातील ताजी कोरोना स्थिती -

एकूण कोरोना रुग्ण - 2,57,72,400

एकूण कोरोनामुक्त - 2,23,55,440

उपचाराधीन रुग्ण - 31,29,878

एकूण मृत्यू - 2,87,122

देशातील कोरोना मृत्यूदर 1.11 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट टक्केंपेक्षा जास्त आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत दररोज घट होत असून याची टक्केवारी 13 इतकी आहे. उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagaradhyaksha Results 2025 : राज्यात भाजपा १ नंबरचा पक्ष, कोणत्या पक्षाचे किती उमेदवार विजयी? वाचा विभागनिहाय यादी...

Latur to Badlapur: लातूर ते मुंबई प्रवास फक्त ५.५ तासांत होणार! कोकण–मराठवाड्याला थेट जोडणारा हाय-स्पीड हायवे मंजूर, पाहा मार्ग

Devendra Fadnavis: नगरपरिषद निवडणुकांत भाजप नंबर वन! देवेंद्र फडणवीसांनी विजयाचं श्रेय कुणाला दिलं? म्हणाले...

हृदयद्रावक घटना! 'टिप्परच्या धडकेत पिता-पुत्राचा जागीच मृत्यू'; आजारी मुलाला शाळेतून आणताना गुरसाळेत काळाचा घाला..

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: भाजपा हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष, आम्ही जनतेचे आभार मानतो - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT