देश

रुग्णसंख्या घटली मात्र मृत्यूदरानं चिंता वाढवली

नामदेव कुंभार

मागील आठवडाभरात कोरोना महामारी (coronavirus india) देशात उच्चांकापर्यंत पोहचली होती. त्यानंतर दररोज मिळणाऱ्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. हे चित्र दिलासादायक असले तरिही मृत्यू दरांमुळे चिंतेत भर पडली आहे. देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर एक टक्केंपेक्षा जास्त झाला आहे. यामुळे एक्सपर्टनी चिंता व्यक्त केली आहे. भारतात गेल्या आठवडाभरात (3 मे ते 9 मे पर्यंत) कोरोनामुळे 27 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झालाय. यादरम्यान 27 लाख नवीन रुग्णही समोर आले. जे आतापर्यंत एका आठवड्यात मिळालेले सर्वाधिक रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत आठवडाभरात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आणि मृत्यू पाहायला मिळाला नव्हता.

एका इंग्रंजी वर्तमानपत्रानुसार, यादरम्यान कोरोना रुग्णांमधील (coronavirus india) वाढ पाच टक्के असल्याचं समोर आलं आहे. दुसऱ्या लाटेतील ही सर्वात कमी वाढ आहे. मागील तीन दिवसांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोना रुग्णांचा मृत्यूदर एक टक्केंच्या पुढे सरकला आहे. तसेच दररोज होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात 15 टक्केंनी वाढ पाहायला मिळाली आहे. तसेच आठवडाभरात पहिल्यांदाच 25 हजारांपेक्षा जास्त रुगणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवडाभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 23 हजार 781 इतकी होती. (india covid 19 cases updates growth rate record slows but death rate crosses 1 percent new trend of corona is increasing the concern of the experts)

रुग्णसंख्या घटतेय-

गेल्या आठवड्यात भारतात कोरोना (coronavirus india) आपल्या सर्वोत्तम पातळीवर होता. दररोज मिळणारी रुग्णसंख्या चार लाखांच्या आसपास होती. यादरम्यान कोरोना महामारी भारतात आपल्या सर्वोच्च पातळीवर होती. आता कोरोना रुग्णसंख्यामध्ये घट पाहायला मिळत आहे. देशात आठवडाभरात 27 लाख 44 हजार 545 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवडाभरात 26.13 लाख रुग्णांपेक्षा पाच टक्के जास्त आहेत. या आठवड्यात 15 टक्केंनी कोरोनाचा वेग वाढला होता. गेल्या आठवड्यात (26 एप्रिल ते 2 मे दरम्यान) 16 टक्के कोरोना वाढला होता. त्याच्या आधीच्या आठवड्यात कोरोना रुग्णसंख्या (coronavirus india) 47 टक्केंनी वाढली होती. रविवारी देशात 3.66 लाख नवीन रुग्ण आढळले. गेल्या आठव्यात दररोज चार लाखांच्या आसपास आढळणारे रुग्णांच्या संख्येत ही मोठी घट होती. गुरुवारी कोरोना रुग्णवाढीचे सर्व विक्रम मोडीत निघाले होते. गुरुवारी देशात 4.14 लाख नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. 6 मे पासून देशात कोरोना रुग्णवाढीमध्ये घट पाहायला मिळत आहे.

मृतांच्या संख्येतही कपात -

कोरोना महामारीमध्ये (coronavirus india) मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही कपात पाहायला मिळत आहे. मागील दोन दिवसापांसून चार हजारांपेक्षा जास्त रुग्ण मृत्यू होत होते. रविवारी यामध्ये कपात पाहायला मिळाली. रविवारी तीन हजार 751 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. मृत्यूदर (CFR ) एक टक्केंच्या आसपास असल्याचं पाहायला मिळालं. देशातील एकूण कोरोना रुग्णांमध्ये मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या संख्येच्या टक्केवारीला CFR म्हटलं जातं. समजा एका दिवसात 100 जणांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर CFR 5 टक्के असेल.

CFR 1.1% पेक्षा जास्त -

देशाचा एकूण सीएफआर 1.1% पेक्षा जास्त आहे. रविवारी देशातील प्रमुख राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये घट पाहायला मिळाली. तीन राज्य आणि एक केंद्र शासीत प्रदेशांमध्ये सर्वाधिक रुग्ण पाहायला मिळाले. तामिळनाडूत 28,897, प. बंगाल 19,441, चंडीगढ 895 आणि मेघालयमध्ये 418 नवीन कोरोना रुग्ण आढळले. पंजाबमध्ये 24 तासांत 191 रुग्णांचा मृत्यू झाला. उत्तराखंडमध्येही मृत्यूच्या संख्येत वाढ पाहायला मिळाली. उत्तराखंड (180) पुदुचेरी (26), मेघालय (18) आणि मणिपूर (15) मध्येही मृत्यूच्या संख्येत वाढ पाहायला मिळाली. देशात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात पाहायला मिळलेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 572 रुग्णांचा मृत्यू झालाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT