covid 19 
देश

भारतात सामुदायिक संसर्ग? ICMR च्या अहवालावर तज्ज्ञांचा आक्षेप 

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली, ता. १३ (पीटीआय) : भारतात सध्या कोरोना संसर्गाच्या रुग्णांत वाढ होत असताना देशात कोविड-१९ चे सामुदायिक संसर्ग नसल्याचा निष्कर्ष आयसीएमआरच्या सिरो सर्व्हेत काढलेला असताना तज्ज्ञांनी मात्र त्यास आक्षेप घेतला. या अहवालात सध्याच्या परिस्थितीचे प्रतिबिंब दिसत नाही आणि सरकार सत्यापासून पळ काढत असल्याची टीका तज्ज्ञांनी केली आहे. देशात अनेक भागात सामुदायिक संसर्ग सुरू झाले असून, सरकारने ते मान्य करून लोकांना त्याबाबत जागरूक करावे, अशी अपेक्षाही तज्ज्ञांनी व्यक्त केली. 

दोन दिवसांपूर्वी आयसीएमआरने कोरोना संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेणारा सिरो सर्व्हे प्रसिद्ध केला. देशातील ६५ जिल्ह्यांत सिरो सर्व्हे करण्यात आला. यानुसार ३० एप्रिलपर्यंत ६५ जिल्ह्यांतील २६,४०० नागरिकांपैकी ०.७३ टक्के नागरिक कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी मात्र कम्युनिटी ट्रान्समिशनची शक्यता फेटाळून लावली आहे.

आयसीएमआरचे प्रोफेसर बलराम भार्गव आणि नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत साधारण लोकसंख्येच्या ठिकाणी संसर्ग पसरण्याचा दर खूपच कमी असल्याचे सांगितले होते; परंतु संसर्गाचे प्रमाण पाहता लोकसंख्येचा मोठा भाग बाधित होण्याच्या दृष्टीने संवेदनशील राहू शकतो. परिस्थिती नियंत्रणात असली, तरीही आपण सजग राहण्याची गरज आहे. आजार पसरण्याचा धोका कायम असल्याचे म्हटले होते.

यासंदर्भात एम्सचे माजी संचालक डॉ. एम. सी. मिश्रा म्हणाले की, देशातील अनेक भागांत सामुदायिक संसर्ग झाला आहे, यात शंका नाही. मोठ्या संख्येने होणारे स्थलांतर आणि काही भागांत बाजारपेठ खुली केल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आजार नसलेल्या ठिकाणी कोरोना पोचला आहे. सध्याच्या काळात अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. दुसरीकडे विषाणूतज्ज्ञ शाहेद जमील यांनी भारताने सामुदायिक संसर्गाचा टप्पा अगोदरच गाठला आहे, असे म्हटले आहे. 

आयसीएमआरचा युक्तिवाद जरी मान्य केला गेला तरी दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबईसारख्या ठिकाणी सामुदायिक संसर्ग होत आहे, हे नाकारता येणार नाही. भारत हा मोठा देश आहे आणि प्रत्येक राज्य वेगवेगळ्या विषाणूचा अनुभव घेत आहे. 
डॉ. अरविंद कुमार, सर गंगाराम रुग्णालय 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 18 लाख एरियर? काय आहे चर्चेतील गणित? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

Madha Ganeshotsav : माढ्याची अनोखी गणेशोत्सव परंपरा! आगमनही अन् विसर्जनही मिरवणुकीविना, अनेक वर्षांची परंपरा

दुष्काळ जाहीर झाला... मदत कधी मिळणार?

Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ३ कंटेनरचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू; रस्त्यावर सांडले फेविकॉल, वाहतुकीवर परिणाम

SCROLL FOR NEXT