India, COVID19, Maharashtra, COVID19 case 
देश

मागील 24 तासांत देशात आढळले इतके नवे रुग्ण, गाठला आतापर्यंतचा विक्रमी आकडा

यूएनआय

नवी दिल्ली : देशातील कोरोना विषाणूचो वाढते संक्रमण कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. मागील 24 तासांत देशात 11, 458 नवे रुग्ण आढळले असून देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 3,08,993 वर पोहचला आहे. एका दिवसात सर्वाधिक नवे रुग्ण आढळल्याचा हा विक्रमी आकडा आहे. मागील 24 तासांत 386 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्याच्या घडीला देशात 1,45,779 रुग्ण असून 1,54,330 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 8,884 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.   
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या 13 जून 2020 च्या आकडेवारीनुसार,  महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेले सर्वाधिक रुग्ण आहेत.

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने लाखाचा टप्पा पार केला असून दिवसागणिक याच्यात वाढच होताना दिसत आहे. त्यापाठोपाठ तमिळनाडू राज्याचा नंबर लागतो. याठिकाणी 40 हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत 36 हजारहून अधिक तर गुजरातमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 22 हजारहून अधिक आहे. एका दिवसात 11 हजारहून अधिक रुग्ण आढळल्याची आतापर्यंतची पहिली वेळ असून ही बाब प्रशासन आणि सरकारचे डोकेदुखी वाढवणारी अशीच आहे. 

जगभरात कोरोनाची दहशत पाहायला मिळत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. देशात दोन महिन्याहून अधिक काळ लॉकडाउन असला तरी कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात उतार आल्याचे दिसत नाही. कोरोनाजन्य संकटाचा सामना करण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे आर्थिक समस्या अधिक चिंताजनक बनली असून हे संकट टाळण्यासाठी वेगवेगळ्या भागात लॉकडाउनमध्ये सूट देण्यात आली आहे.  एकीकडे लॉकडाउन उठवण्याच्या हालचाली सुरु असताना चंदीगडमध्ये परिस्थिती पुन्हा निर्बंधमय होताना दिसतेय. कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेत चंदिगडमध्ये आंतरराज्यातील बस सेवा पूर्णत: स्थगित करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT