India government Z security to owaisi  eSakal
देश

हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून ओवैसींच्या सुरक्षेत वाढ, दिली Z सिक्युरिटी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (AIMIM MP Asaduddin Owaisi) यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना गुरुवारी घडली. त्याचा व्हिडिओ देखील समोर आला. याप्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली. आता केंद्र सरकारने ओवैसींच्या सुरक्षेच्या आढावा घेत त्यांच्या सुरक्षेत वाढ केल्याची माहिती मिळतेय.

ओवैसींवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली होती. हापूर-गाझियाबाद भागातील राष्ट्रीय महामार्गावर २४ वरील छिजारसी टोल प्लाझाजवळ गाडी आली असता सायंकाळी सहा वाजता माझ्या गाडीवर चार गोळ्या झाडल्या गेल्या. गोळीबार करणारे तीन-चार जण होते. पण, ते शस्त्रे टाकून सर्वजण पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली. तेव्हा दुसऱ्या गाडीतून मी पुढे गेलो, असं औवेसींनी म्हटलं. त्यानंतर केंद्र सरकारने त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला. तसेच त्यांना सीआरपीएफची झेड सिक्युरिटी प्रदान करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान, ओवैसी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर (Attack on Asaduddin Owaisi) आता काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. ओवैसींवर झालेल्या हल्ल्यातील आरोपी सचिन पंडित आणि शुभम या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, दोन्ही आरोपींची चौकशी सुरू आहे. त्यातील सचिन हा कायद्याचा विद्यार्थी असून, तो भाजप पक्षाचा सदस्य असल्याचं समजतंय. तसंच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा, खासदार महेश शर्मा यांच्यासह अनेक भाजप नेत्यांसोबत सचिनचे फोटो आहेत. सोशल मीडियावरून हे फोटो आता समोर येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahyadri Tiger Reserve : वाघांची डरकाळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार, आणखी आठ वाघ वास्तव्यास येणार; केंद्र-राज्य शासनाचा निर्णय

PM Narendra Modi : 'ऑपरेशन सिंदूर' वेळी कॉंग्रेस पाकिस्तानच्या लष्कराच्या पाठिशी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

१६ वर्षांच्या भावाला आणून द्या आणि सामना खेळवा; पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचा भारत-पाकिस्तान मॅचला विरोध

Pune Traffic Update : पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शास्त्रीनगर चौकात उपाययोजना; वाहतूक कोंडीवर तोडगा

Video : शुभांशु शुक्लांनी सांगितलं, अंतराळात व्यायाम कसा करतात? तशीच आसने पृथ्वीवर केल्यास शरीराला कोणते फायदे होतात, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT