plasma 
देश

प्लाझ्मा थेरपीला कोरोनावरील उपचारातून वगळलं

सूरज यादव

प्लाझ्मा थेरपीला प्रौढ रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांमधून वगळलं आहे. याबाबत टास्क फोर्सने नवीन गाइडलाइन्स (New Guidelines) जारी केल्या आहे.

नवी दिल्ली - कोरोनावर (Corona) उपचार करत असताना प्लाझ्मा थेरपी (Plasma Therapy) आतापर्यंत वापरण्यात येत होती. मात्र या थेरपीबाबत केंद्र सरकारने (India Government) महत्त्वाचा असा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या टास्क फोर्सने (Task Force) आता प्लाझ्मा थेरपीला प्रौढ रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांमधून वगळलं आहे. याबाबत टास्क फोर्सने नवीन गाइडलाइन्स (New Guidelines) जारी केल्या आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी वापरण्यासाठी परवानगी होती. कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर पहिल्या सात दिवसांमध्ये प्लाझ्मा थेरपी वापरता येत होती. मात्र आता प्लाझ्मा थेरपीला टास्क फोर्सकडून उपचाराच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. (india government remove plasma therapy from covid 19 treatment for adults)

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर), एम्स दिल्ली आणि इतर तज्ज्ञांसोबत चर्चा केल्यानंतर कोरोनावर उपचारासाठीची नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. प्लाझ्मा थेरपीचा उपचार हा कोरोनावर परिणामकारक असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर प्लाझ्मा दान करण्यासंदर्भात आवाहनही करण्यात आलं. पण आता अभ्यासामधून प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नसल्याचं आढळून आलं आहे.

आयसीएमआर आणि टास्क फोर्स यांच्यामध्ये शुक्रवारी बैठक झाली. यावेळी प्लाझ्मा थेरपी प्रौढ रुग्णांच्या उपचारामधून वगळण्याबाबत तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं होतं. प्लाझ्मा थेरपीच्या उपचार पद्धतीबाबत संशोधकांसह डॉक्टर्सनी प्रश्न उपस्थित केले होते. यामध्ये केंद्रीय वैद्यकीय सल्लागार डॉक्टर विजय राघवन यांचाही समावेश होता. त्यांनी आयसीएमआर आणि दिल्लीतील एम्सच्या संचालकांना पत्र लिहिलं होतं.

भारतात प्लाझ्मा थेरपीचा वापर विज्ञानाला धरून नसल्याचं राघवन यांनी पत्रात म्हटलं होतं. प्लाझ्माबाबत करण्यात आलेल्या संशोधनात अशी माहिती समोर आली होती की, प्लाझ्मा उपचार पद्धतीने रुग्णावर चांगला परिणाम होत नाही. तरीसुद्धा देशातील रुग्णालयांमध्ये या उपचार पद्धतीचा वापर केला जातोय. रुग्णांचे नातेवाईक आणि जवळचे लोक प्लाझ्मासाठी दात्यांचा शोध घेतात. त्यासाठी त्यांनी खूप दमछाक होते असंही राघवन यांनी पत्रात म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Fire Incident Video : निवडणुकीच्या विजय जल्लोषादरम्यान मोठी आग; दोन नवनिर्वाचित नगरसेवक भाजले, अनेक लोक जखमी, जेजूरीतील धक्कादायक Video समोर...

Muncher Municipal Result:'मंचर नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या राजश्री गांजाळे'; आमदार शरद सोनवणेंनी फुगडीतून व्यक्त केला आनंद..

राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष! एम.कॉम.चे शिक्षण घेणारी २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे मोहोळच्या नगराध्यक्षा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या शुभेच्छा

Marathwada Sahitya Sammelan: ४५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी फ. म. शहाजिंदे; बीड जिल्ह्यात हाेणार संमेलन!

Nagaradhyaksha Election Poll Results : नगराध्यपदाच्या निकालानंतर अजित पवार गटाच्या नेत्याने टोचले स्वत:च्या पक्षाचे कान; म्हणाले, आत्मचिंतनाची गरज!

SCROLL FOR NEXT