corona vaccination sakal news
देश

कोरोना लसीकरणाला एक वर्ष पूर्ण; भारतीयांनी घेतले 156.76 कोटी डोस

Corona Vaccination in India: भारतामध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात होऊन एक वर्ष पुर्ण झाले. यादरम्यान भारतामध्ये एकूण 156.76 लसींचे (Dose) डोस देण्यात आले.

सकाळ डिजिटल टीम

भारतामध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात होऊन एक वर्ष पूर्ण झाले. यादरम्यान भारतामध्ये (India) एकूण 156.76 लसींचे (Dose) डोस देण्यात आले. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Ministry of Health and Familty Welfare) सांगितले की, रविवारी सकाळी 7 पर्यंत 1,56,76,15,454 कोविड 19 लसींचे डोस (Vaccination) देण्यात आले आहेत. एकूण 1,68,19,744 सत्रांमध्ये (Sessions) हे लसीकरण केलं गेले. याशिवाय शेवटच्या 24 तासात तब्बल 66 लाख लोकांना लस दिली गेली.(India has completed one year of corona vaccination)

सरकारी माहितीनुसार, प्रतिबंधात्मक 43,19,278 डोस दिले गेले. त्यापैकी 17,92,782 आरोग्य कर्मचाऱ्यांना, 14,45,001 डोस फ्रंटलाईन वर्कर्स तसेच 10,81,493 डोस 60 वर्षांवरील नागरिकांना दिले गेले. तसेच 15-18 वर्ष वयोगटासाठी 3,38,50,912 डोस दिले गेले. भारतात कोरोना लसीकरणाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandviy) यांनी या लसीकरणाला 'जगातील सर्वात यशस्वी' असं वर्णन केले आहे. सुरुवातीच्या काळात लसीकरण आरोग्य कर्मचाऱ्यांना, त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्सनासुद्धा, नंतर 60 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाल सुरुवात झाली. यानंतर अनुक्रमे 45-60 वर्ष वयोगटातील नागरिक आणि 18-45 वयोगटातील नागरिकांना लसीकरणाला सुरुवात झाली. यंदा 3 जानेवारीपासून 15-18 वर्षे वयोगटातील तरूणांनाही लसीकरणाला सुरुवात झाली.

भारतामध्ये प्रामुख्याने भारत बायोटेकने विकसित केलेल्या 'कोवॅक्सिन' (Covaxin)आणि 'सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया द्वार बनवलेली ऑक्सफर्ड एस्ट्राजिनाची 'कोव्हीशील्ड'(Covishield) या दोन लसी दिल्या गेल्या.

ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने आपात्कालीन परिस्थितीमध्ये मॉडर्ना, जॉन्सन-जॉन्सन तसेच Zydus Cadila या तीन लसींच्या वापराला परवानगी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News: अजिंठा डोंगररांगेत निसर्गाचे १४ नवीन झरे शोधले; १९१०च्या ब्रिटिश नकाशातील दोन झरे अजूनही जिवंत

Pune News: गड्या आपला गावच बरा! युद्धानंतर महागाईचा भडका, २० रुपयांचे पोहे ३५ रुपयांवर; विद्यार्थ्यांनी धरली गावची वाट

Petrol Diesel Prices India : मध्य पूर्वेतील तणावाचा तेलांच्या किमतीवर परिणाम ! जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

‘धुरंधर 2’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पण प्रकाश राज यांचा बॉलिवूडवर सवाल, 'हिंदी कलाकार गप्प का?'

Chhatrapati Sambhajinagar: पुण्यातील मेसवर गॅस टंचाईचा फटका; चुलीवर स्वयंपाक, मेन्यू बदलला.

SCROLL FOR NEXT