Women Pilot esakal
देश

Women Pilot : जगात महिला वैमानिकांची संख्या भारतात सर्वाधिक; जाणून घ्या काय आहे खास

भारतात महिला सक्षमीकरणासाठी चालवल्या जात असलेल्या मोहिमांचा परिणाम आता दिसून येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतात महिला सक्षमीकरणासाठी चालवल्या जात असलेल्या मोहिमांचा परिणाम आता दिसून येत आहे.

नवी दिल्ली : भारतात महिला सक्षमीकरणासाठी चालवल्या जात असलेल्या मोहिमांचा परिणाम आता दिसून येत आहे. जागतिक लैंगिक समानता क्रमवारीत 146 देशांपैकी 135 व्या क्रमांकावर असलेला देश, त्या देशातील महिलांनी वैमानिकाच्या (Women Pilot) बाबतीत संपूर्ण जगाला मागं टाकलंय. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ वुमन एअरलाइन पायलट्सनं (International Society of Women Airline Pilots) एक अहवाल जारी करून ही माहिती दिलीय.

आकडेवारीनुसार, जगातील एकूण वैमानिकांपैकी 5.8 टक्के महिला आहेत. महिला वैमानिकांच्या बाबतीत भारतानं जागतिक सरासरीला मागं टाकलं आहे. भारतात महिला वैमानिकांचं प्रमाण 12.4 टक्के आहे, जे जगात सर्वाधिक आहे. ज्या देशात पुरुषांची मक्तेदारी मानली जात होती, आज तिथंही महिला झेंडा फडकवताना दिसत आहेत. STEM आणि तांत्रिक क्षेत्र त्यांच्यासाठी आकर्षण ठरलं आहे. भारतीय सशस्त्र दलातही (Indian Army) महिला वैमानिकांच्या भरतीला वेग आला आहे.

कुटुंबाकडून पाठिंबा

एका अहवालानुसार, भारतीय महिला वैमानिकांना त्यांच्या कुटुंबीयांकडूनही पूर्ण पाठिंबा मिळत आहे. प्रादेशिक विमान कंपन्या जगभरातील बहुतांश महिलांना नोकरी देतात. महिला वैमानिकांमध्ये त्यांचा वाटा 6.4 टक्के आहे. भारतातील प्रादेशिक विमान कंपन्यांमध्ये 13.9 टक्के महिला पायलट आहेत, तर भारतीय मालवाहू विमान कंपन्यांमध्ये सर्वात कमी महिला पायलट आहेत. यामध्ये कॅनडा (Canada) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) आघाडीवर आहे.

विमान कंपन्या पुरवतात अत्यावश्यक सुविधा

भारतातील विमान कंपन्यांनी महिला वैमानिकांसाठी अतिशय आरामदायक वातावरण निर्माण केलंय. देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोबद्दल बोलायचं झालं, तर ती या वैमानिकांना अगदी सोप्या अटींवर नोकऱ्या देते. महिला वैमानिकांना गरोदरपणात उड्डाण करण्याची परवानगी नाहीय. कायद्यानुसार, त्यांना 26 महिन्यांच्या पगारासह प्रसूती रजा दिली जाते. यासोबतच लहान मुलांच्या संगोपनासाठी त्यांना रजा मिळते. मुलं 5 वर्षांचे होईपर्यंत महिला पायलेट्स करारानुसार सुट्टी घेऊ शकतात. यामध्ये एका कॅलेंडर महिन्यात 2 आठवड्यांची रजा दिली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT