India halts postal service to the United States, marking a significant diplomatic and service-related decision.  esakal
देश

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

India Suspends Postal Service to the United States: भारतीय टपाल विभागाने शनिवारी ही घोषणा केली आहे ; जाणून घ्या, नेमकं काय म्हटलं आहे?

Mayur Ratnaparkhe

India US Postal Service News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पा यांनी भारतावर आरोप करत, अतिरिक्त टॅरिफ लादलेला आहे. त्यानंतर भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये ट्रेड वॉरला सुरूवात झालेली आहे. यात भारताच्या बाजूने रशिया, चीन या हे दोन बलाढ्य देश उभा राहिल्याने, अमेरिकेचा अधिकच जळफळाट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे अमेरिका भारताला पुन्हा पुन्हा लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता भारतानेही अमेरिकेला सडेतोड प्रत्युत्तर देणं सुरू केलेलं आहे.

 अमेरिकेसोबत टॅरीफमुळे बिघडत चाललेल्या संबंधांमध्ये भारताने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताने २५ ऑगस्टपासून अमेरिकेला जाणारी टपाल सेवा बंद केली आहे. भारतीय टपाल विभागाने शनिवारी  ही घोषणा केली आहे. अमेरिकेच्या कस्टम नियमांमध्ये बदल झाल्यामुळे भारताने हे पाऊल उचलले आहे.

ट्रम्प प्रशासनाने ३० जुलै रोजी एक आदेश जारी केला, ज्याअंतर्गत ८०० डॉलर्सपर्यंतच्या वस्तूंवरील कस्टम ड्युटीवरील सूट रद्द करण्यात आली. तर याआधी कमी किमतीच्या वस्तू शुल्काशिवाय अमेरिकेत पोहोचत होत्या, परंतु आता असे होणार नाही. २९ ऑगस्टपासून अमेरिकेला पाठवलेल्या प्रत्येक किमतीच्या वस्तूंवर कस्टम ड्युटी आकारली जाणार आहे. तथापि, १०० डॉलर्सपर्यंतच्या कागदपत्रांवर आणि भेटवस्तूंवर सूट असणार आहे.

नवीन नियम आंतरराष्ट्रीय आपत्कालीन अर्थव्यवस्था अधिकार कायद्यांंतर्गत लागू होईल. यूएस कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शनने १५ ऑगस्ट २०२५ रोजी एक निर्देश जारी केला, की ट्रान्सपोर्ट कॅरियर्स अँड क्वालिफाइड पार्टी यांना आंतरराष्ट्रीय टपाल शिपमेंटवर शुल्क जमा करावे लागेल.

तर ज्या ग्राहकांनी या परिस्थितीमुळे अमेरिकेत पाठवता येणार नाहीत अशा वस्तू आधीच बुक केल्या आहेत, ते टपाल खर्च परत मागू शकतात. टपाल विभागाने सांगितले, अमेरिकेसाठी शक्य तितक्या लवकर पूर्ण सेवा पूर्ववत करण्यासाठी सर्व शक्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SMAT 2025: T20 सामन्यात सुपर ओव्हरचा ड्रामा! अभिषेक शर्मा गोल्डन डकवर बाद, CSK च्या गोलंदाजांनं दोनदा धाडलं माघारी

Latest Marathi News Live Update : हिंगणघाटमध्ये फडणवीसांची ‘विजय संकल्प’ सभा; चुरशीच्या लढतीकडे राज्याचे लक्ष!

Vitamin C Serum: हिवाळ्यातील ड्राय स्किनसाठी घरच्या घरी बनवा 'व्हिटॅमिन C' सीरम, जाणून घ्या सोपे आणि उत्तम उपाय

Kolhapur Politics : अपक्षांचा खेळ उधळणार? कागल निवडणुकीत मतांसाठी गट-तटांची धडपड आणि राजकीय रणनीतीने तापला माहोल

Video: भिंत पाडण्यासाठी आमदार स्वतः चढले जेसीबीवर; दिलीप लांडेंचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT