Indian Army esakal
देश

भारताचा लष्करी खर्च जगात तिसऱ्या क्रमांकावर, अमेरिका-चीन आघाडीवर

SIPRI नुसार, 2021 मध्ये जागतिक लष्करी खर्च युएस डॉलर 2.1 ट्रिलियनवर पोहोचला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) नुसार 2021 मध्ये भारत लष्करी खर्च करण्यामध्ये तिसऱ्या स्थानावर होता. 2021 मध्ये भारताचा लष्करी (Indian Army) खर्च 76.6 डॉलर अब्ज होता, जो 2020 च्या तुलनेत 0.9 टक्के आणि 2012 च्या तुलनेत 33 टक्क्यांनी वाढला आहे. सर्वाधिक खर्च (Army Expenditure) करणार्‍या पहिल्या तीन देशांमध्ये अमेरिका, चीन आणि भारत यांचा समावेश आहे. SIPRI नुसार, 2021 मध्ये जागतिक लष्करी खर्च USD 2.1 ट्रिलियनच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला आहे. (Indian Military Spending Expenditure Third Highest World Arms)

जागतिक लष्करी खर्चात 0.7 टक्के वाढ

अहवालानुसार, 2021 मध्ये जागतिक लष्करी खर्च 0.7 टक्क्यांनी वाढून युएस डॉलर 2113 अब्जांवर पोहोचला आहे. तर, 2021 मध्ये लष्करावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या पाच देशांमध्ये अमेरिका (America), चीन (China), भारत, युनायटेड किंग्डम आणि रशिया (Russia) यांचा समावेश होता. या 5 देशांनी एकूण खर्चाच्या 62 टक्के खर्च केल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. गेल्या वर्षी भारताचा लष्करी खर्च युएस डॉलर 76.6 बिलियनसह तिसऱ्या क्रमांकावर होता. म्हणजेच 2020 च्या तुलनेत सरकारने यामध्ये 0.9% ने वाढ केली आहे. याशिवाय स्वदेशी शस्त्रास्त्र उद्योगाला बळकटी देण्यासाठी 2021 च्या लष्करी बजेटमध्ये 64% बजेट राखून ठेवण्यात आले आहे.

युनायटेड स्टेट्स आणि चीनने जगातील सर्वाधिक लष्करी खर्च करणाऱ्यांच्या यादीत पहिले आणि दुसरे स्थान पटकावले आहे. 2021 मध्ये यूएस लष्करी खर्च USD 801 बिलियनवर पोहोचला, जो 2020 च्या तुलनेत 1.4 टक्क्यांनी कमी आहे. दुसरीकडे चीनने संरक्षणावर USD 293 अब्ज खर्च केले, 2020 च्या तुलनेत 4.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या 10 वर्षांत, यूएसने लष्करी संशोधन आणि विकासासाठी बजेटमध्ये 24% वाढ केली आणि शस्त्रास्त्रांच्या खरेदीवरील खर्च 6.4% ने कमी केला आहे.

ब्रिटनने गेल्या वर्षी संरक्षणावर 68.4 डॉलर अब्ज खर्च केले, जे 2020 च्या तुलनेत 3% जास्त आहे. त्याचबरोबर दोन महिन्यांपासून युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाने संरक्षण खर्चात पाचवे स्थान मिळवले आहे. 2021 मध्ये रशियाने आपला लष्करी खर्च 2.9% ने वाढवून US$65.9 अब्ज इतका केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT