india alliance mumbai meeting seat sharing formula for lok sabha 2024 congress ncp shivsena political news  
देश

INDIA Mumbai Meeting: मुंबईतील बैठकीपूर्वीच 'इंडिया' आघाडीत बिघाडी? आप-काँग्रेसमध्ये पुन्हा वादाची ठिणगी

येत्या ३१ ऑगस्ट रोजी मुंबईत 'इंडिया'ची तिसरी बैठक पार पडणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक येत्या ३१ ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडणार आहे. पण या बैठकीपूर्वीच आघाडीत बिघाडी होतेय की काय अशी चर्चा होतेय. त्याचं कारणही तसंच आहे. दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे. आपचे नेते दिलीप पांडे यांच्या विधानावरुन याची चर्चा सुरु झाली आहे. (INDIA Mumbai Meeting again spark in AAP and Congress in over Delhi Politics)

आपचे समन्वयक अरविंद केजरीवाल हे मुंबईतील इंडियाच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं कळतं आहे. कारण राजधानी दिल्लीत आप आणि काँग्रेसमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आम आदमी पक्षाबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली. (Latest Marathi News)

तर आपकडूनही नाराजीचा सूर आवळला जातोय. जर दिल्लीमध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवणार असेल तर इंडिया आघाडीच्या बैठकीला कशासाठी जायचं? अशी भूमिका आपनं घेतल्याचं बोललं जात आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घेणार आहेत. (Marathi Tajya Batmya)

आपनं काय म्हटलंय?

काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वानं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत कुठलीही आघाडी न करण्याचा निर्णय घेतल्याचं आम्हाला कळतं आहे. त्यामुळं मग लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी निर्माण झालेल्या या 'इंडिया' आघाडीत सामिल होण्याला काही अर्थ राहत नाही, असं आप नेते दिलीप पांडे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Shakti: शक्ती चक्रीवादळ कुठे पोहोचले? धोका नेमका कधी टळणार? हवामान खात्याकडून तारीख जाहीर

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

SCROLL FOR NEXT