मुंबई ; लॉकडाऊन शिथील होताच देशात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. गुरुवारी एकाच दिवशी 10,956 नवे कोरोना बाधित सापडले आहेत. एकाच दिवशी रुग्णाची ही सर्वाधिक जास्त संख्या आहे. यासोबतच देशात एकुण रुग्णसंख्या 2,97,535 एवढी झाली आहे. ग्रेट ब्रिटेनला मागे टाकून सर्वाधिक बाधित देशांच्या क्रमवारीत भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
देशातल्या बाजारपेठा, कार्यालये, वाहतूक सेवा टप्प्या टप्प्याने सुरु होत आहे. मात्र या काळात कोरोना बाधितांची वाढणारी संख्या चितांजनक आहे. गुरुवारी सापडलेल्या 10,956 रुग्णांमध्ये महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, गुजरात या पाच राज्यातील 8312 रुग्णांचा समावेश आहे. एकट्या महाराष्ट्रात काल 3607 नवे कोरोना बाधितांची भर पडली.
भारत केवळ तीन देशांच्या मागे
गेल्या आठवड्यात रुग्णसंख्येत भारताने स्पेनला मागे टाकले होते. कोरोनामुळे ग्रेट ब्रिटेनमध्ये आतापर्यंत 40 हजारापेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे.तर आतापर्यंत संसर्ग झालेल्यांची संख्या 2,91,409 वर पोहोचली आहे. मात्र गेल्या 10 दिवसापासून ब्रिटेनमध्ये रुग्णसंख्येत दररोज घट होतांना दिसते आहे. भारताच्या पुढे आता रशिया, ब्राझील आणि अमेरिका हे देश आहे. परंतु, इतर देशांच्या तुलनेत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण भारतात खूप कमी आहे ही बाब दिलासादायक आहे.
जगभरात 74 लाख रुग्ण
कोरोनामुळे जगात 4,21,200 लोक दगावले आहेत. एकट्या अमेरिकेत एक लाख 13 हजारांपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. तर ग्रेट ब्रिटेन आणि बाझीलमध्ये कोरोना बळींची संख्या प्रत्येकी 41 हजाराच्या वर पोहोचली आहे. जगातील 190 देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 75 लाखाच्या जवऴपास पोहोचली आहे. यापैकी फक्त अमेरिकेत 20 लाख बाधित आहेत.
जगातील टॉप 6 कोरोना बाधित देश
1.अमेरिका
कोरोना बाधितांची संख्या- 20,34,016
मृत्यु- 1,13,973
2. ब्राझील
कोरोना बाधितांची संख्या - 8,02,828
मृत्यु- 40,919
3. रशिया
कोरोना बाधितांची संख्या – 5,01,800
मृत्यु- 6,522
4. भारत
कोरोना बाधितांची संख्या - 2,97,535
मृत्यु- 8,498
5. ग्रेट ब्रिटेन
कोरोना बाधितांची संख्या - 2,91,409
मृत्यु – 41,279
6. स्पेन
कोरोना बाधितांची संख्या - 2,42,707
मृत्यु- 27,136
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.