भारत आशियातील चौथा शक्तीशाली देश sakal
देश

Asia Power Index : भारत आशियातील चौथा शक्तीशाली देश

लोवि इन्स्टिट्यूट एशिया पॉवर इंडेक्स २०२१ ने रँकिंग जाहीर केले

सकाळ वृत्तसेवा

भारत हा आशियातील चौथा शक्तीशाली देश ठरला आहे. नुकतंच लोवि इन्स्टिट्यूट एशिया पॉवर इंडेक्स २०२१ ने रँकिंग जाहीर केले. भविष्याच्या दृष्टीने संसाधनांच्या बाबतीत भारताची कामगिरी जबरदस्त असल्याचं यामध्ये म्हटलं आहे.

लोवि इन्स्टिट्यूटने वार्षिक एशिय़ा पॉवर इंडेक्स जाहीर करण्यास २०१८ मध्ये सुरुवात केली. आशियातील देशांची ताकद ठरवण्यासाठी संबंधित देशांचा प्रभाव आणि संसाधने यांचे निकष लावण्यात आले. देशाची ताकद आणि भविष्यात ती ताकद कशा पद्धतीने कायम ठेवण्यात येते किंवा त्यातील बदलांचा अभ्यास यातून केला जातो. आशियात भारताला मध्यम शक्ती म्हणून एक स्थान दिलं जातं, तर २०२० च्या तुलनेत भारताच्या गुणांमध्ये २ अंकांनी घसरण झाली आहे. २०२१ मध्ये भारत मोठ्या पॉवर ट्रेशहोल्डपेक्षा कमी आहे. २०२१ मध्ये ज्या देशांचे गुण कमी झाले आहेत अशा १८ देशांमध्ये भारताचा समावेश असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

भविष्यातील संसाधनामध्ये भारताची कामगिरी सर्वोत्तम अशी आहे. यात अमेरिका आणि चीन हे देश भारताच्या पुढे आहेत. कोरोनामुळे भारताच्या विकासाची क्षमता ही २०३० साठीच्या अपेक्षित विकासाची वाढ ही कमी राहणार असल्याचंही लोवि इन्स्टिट्यूटने म्हटलं आहे. भारत आर्थिक क्षमतेबाबत, लष्करी ताकद, लवचिकता आणि सांस्कृतिक प्रभाव यामध्ये चौथ्या स्थानी आहे. संरक्षणाच्या बाबतीत भारत ७ व्या स्थानी आहे. तसंच प्रादेशिक संरक्षणात भारताची प्रगती असल्याचंही यामध्ये सांगण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका यांच्याशी चांगले संबंध असल्याचंही यात सांगण्यात आले आहे. तर आर्थिक पातळीवर मात्र भारताची घसरण झाली असून ८ व्या क्रमांकावर पोहोचला असल्याचं लोवी इन्स्टिट्यूटने त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

भारताकडे असलेली संसाधने आणि त्यातुलनेत देशात दिसणारा प्रभाव कमी असल्याचंही यामध्ये म्हटलं आहे. निगेटिव्ह पॉवर गॅप स्कोअर मध्ये २०२१ च्या तुलनेत यावर्षी घसरण झाली आहे. जगभरात कोरोनामुळे भारतासह अनेक देशांना फटका बसला आहे. आशिया पॅसिफिकमध्ये शक्तीशाली म्हणून आघाडीचे दहा देश हे अमेरिका, चीन, जपान, भारत, रशिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, सिंगापूर, इंडोनेशिया आणि थायलंड असल्याचं लोवि इन्स्टिट्यूटने म्हटलं आहे. अमेरिकेन दोन मुद्द्यांवर घसरलेलं रँकिंग सुधारलं आहे. तर काही ठिकाणी चीनला मागे टाकलं. मात्र, आर्थिक पातळीवर नुकसान झाल्यानं त्यांना याबाबतीत फटका बसला आहे. चीनच्या सर्वसमावेशक शक्तीमध्येही घसरण झाली आहे. कोरोनातून सावरताना भिन्न असे आर्थिक परिणाम या दशकभरात देशांच्या प्रभावातही बदल करणारे असतील. २०३० मध्ये तैवान, अमेरिका, सिंगापूर या मोठ्या अर्थव्यवस्था असतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर २०२० च्या तुलनेत जपानमध्ये मात्र सुधारणा दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAP Raghav Chadha Controversy : राघव चढ्ढा यांनी पंतप्रधान मोदी अन् भाजपविरोधी पोस्ट डिलिट केल्या, 'आप' नेते सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा

सोनम कपूरने बाळाला जन्म दिल्यानंतर मानले संपूर्ण स्टाफचे आभार ! सोशल मीडियावर लिहिली खास पोस्ट

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Latur News: धरण ढवळले, पाणी खवळले; पिवळ्या पाण्याच्या पुरवठ्यामुळे लातूरकर त्रस्त; महापालिका म्हणते काम सुरू

Jalna News: रामनगरमध्ये अवकाळी पावसाने रब्बी पिकांची केली माती; शेतकऱ्यांना दुहेरी संकट; पंचनामे करून भरपाईची मागणी

SCROLL FOR NEXT