coronavirus situation in india esakal
देश

Coronavirus : देशात कोरोनाचा पुन्हा कहर; 24 तासांत रुग्णांची संख्या हजाराच्या पुढं, मागील 10 दिवसांची आकडेवारी पहा

देशात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) पुन्हा डोके वर काढत आहे.

सकाळ डिजिटल टीम

देशातील दैनंदिन सकारात्मकता दर आता 1.09 टक्क्यांवर गेला आहे. साप्ताहिक सकारात्मकता दर 0.98 टक्के आहे, तर सक्रिय केस 0.02 टक्के आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) पुन्हा डोके वर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे.

आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) सांगितलं की, गेल्या 24 तासांत कोविड-19 चे एकूण 1,134 नवीन रुग्ण आढळले आहेत. दोन दिवसांनंतर देशात कोरोनाची हजाराहून अधिक प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. यापूर्वी 19 मार्चला 1,071 प्रकरणं नोंदवली गेली होती, तर काल म्हणजेच मंगळवारी 699 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.

सक्रिय प्रकरणांमध्ये वाढ

देशातील सक्रिय कोरोना रूग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. देशात आता कोरोनाचे सक्रिय रुग्ण 7,026 वर पोहोचले आहेत. आतापर्यंत देशात कोरोनाचे 4 कोटी 46 लाख 98 हजार 118 रुग्ण आढळले आहेत. त्यातून 4 कोटी 41 लाख 60 हजार 279 लोक बरे झाले आहेत.

24 तासांत पाच रुग्णांचा मृत्यू

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनामुळं पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र आणि केरळमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 5 लाख 30 हजार 813 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.

गेल्या 10 दिवसांची आकडेवारी पहा

  • 21 मार्च रोजी 699

  • 20 मार्च रोजी 918

  • 19 मार्च रोजी 1,071

  • 18 मार्च रोजी 843

  • 17 मार्च रोजी 796

  • 16 मार्च रोजी 754

  • 15 मार्च रोजी 618

  • 14 मार्च रोजी 402

  • 13 मार्च रोजी 444

  • 12 मार्च रोजी 524

देशातील दैनंदिन सकारात्मकता दर आता 1.09 टक्क्यांवर गेला आहे. साप्ताहिक सकारात्मकता दर 0.98 टक्के आहे, तर सक्रिय केस 0.02 टक्के आहे. आतापर्यंत देशात कोरोना लसीचे 220.64 कोटी पेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. 102.73 कोटींहून अधिक लोकांना पहिला डोस मिळाला आहे. याशिवाय, 95.19 कोटी पेक्षा जास्त लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra government : 'देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री तर चंद्रशेखर बावनकुळेंची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार?'; संजय राऊतांचा मोठा दावा

Nagpur: वाघाला पकडण्यासाठी दोघांचा थेट पिंजऱ्यात मुक्काम; कुही जवळील वेलतूरच्या जंगलात रंगला थरार

Latest Marathi News Live Update : लष्कर परिसरातील फलटण मशिदीसमोर १८ वर्षीय तरुणास पाच ते सहा जणांनी केली बेदम मारहाण

Panchgani Case : दारूच्या नशेत घरात डोकावला अन्...; इंदापूरच्या पर्यटकाचा पाचगणीत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत खून; 4 जणांना 14 जुलैपर्यंत पोलिस कोठडी

RSS Belagavi Meeting : 'आरएसएस'च्या बैठकीनंतरच साहित्यिक कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य, नव्या वादाला फुटलं तोंड

SCROLL FOR NEXT