Lockdown Google file photo
देश

लॉकडाउनबाबतचा भारताचा 'ग्लोबल स्ट्रिंजन्सी इंडेक्स' पोहोचला ७४वर; जाणून घ्या...

लॉकडाउनबाबत संयुक्तपणे मिळवलेल्या डेटावरुन हा इंडेक्स तयार केला जातो.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : या वर्षी १ एप्रिल रोजी भारताचा 'ग्लोबल स्ट्रिंजन्सी इंडेक्स' (Global Stringency Index) ५८ होता जो ३० एप्रिल रोजी ७४वर पोहोचला होता. मात्र, यानंतरचा भारतातील लॉकडाउनच्या स्थिचीचा निश्चित डेटा अद्याप अपडेट झालेला नाही. त्यामुळे जेव्हा हा डेटा अपडेट होईल तेव्हा भारताचा स्कोअर आणखी वर जाईल, असं 'ग्लोबल स्ट्रिंजन्सी इंडेक्स'च्या अपडेटेड डेटावरुन समोर आलं आहे. (India score on Global Stringency Index jumps to 74 you need to know)

'दि ऑक्सफर्ड कोरोना व्हायरस गव्हर्नमेंट रिस्पॉन्स ट्रॅकर'नं विविध देशातील लॉकडाउनच्या संयुक्तपणे मिळवलेल्या डेटावरुन हा इंडेक्स तयार केला आहे. बंद असलेल्या शाळा आणि कामाची ठिकाणं, रद्द झालेले सार्वजनिक कार्यक्रम तसेच सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावरील निर्बंध, अतंर्गत आणि बाह्य स्वरुपाच्या हालचालींवर निर्बंध, घरीच राहण्याची आवश्यकता तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवणे या सर्व बाबींचा एकत्रित विचार करुन प्रत्येक देशाचा 'ग्लोबल स्ट्रिंजन्सी इंडेक्स' ठरवला जातो.

गेल्या वर्षी भारतानं गाठला होता १००चा आकडा

गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देशव्यापी लॉकडाउनवेळी या 'ग्लोबल स्ट्रिंजन्सी इंडेक्स'मध्ये भारताच्या स्कोअरने १०० चा आकडा गाठला होता. सध्या भारतात देशव्यापी लॉकडाउन नाही पण तरीही २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अंशतः लॉकडाउन लागू आहेत. दुसऱ्या भाषेत सांगायचं झाल्यास भारतातील ९८ टक्के लोकसंख्या ही काही प्रमाणात लॉकडाउनचा सामना करत आहे.

तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि महाराष्ट्रात सध्या पूर्ण लॉकडाउनची स्थिती आहे. तर गुजरात, तेलंगणा, आसाम आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये काही प्रमाणात निर्बंध लागू आहेत. पण या राज्यांमध्ये अद्याप पूर्ण लॉकडाउन लावलेला नाही. दरम्यान, तामिळनाडू आणि केरळसारख्या राज्यांमध्ये रेशनकार्ड धारकांना मदत म्हणून रोख रक्कम आणि धान्याची पाकिट पुरवली जात आहेत. तर इतर राज्यांनी गरीब आणि दारिद्रयरेषेखालील जनतेसाठी अद्याप लॉकडाउनसाठीच्या कल्याणकारी योजना जाहीर केलेल्या नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT