India firmly counters former US President Donald Trump’s tariff threat, signaling a tough stance on unfair trade pressure.  esakal
देश

India responds strongly to Trump: ट्रम्प यांचे आरोप अन् टॅरिफ वाढवण्याच्या धमकीला आता भारताचंही सडेतोड प्रत्युत्तर, म्हटले...

India responds strongly to Trump’s tariff threats : जाणून घ्या, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी अमेरिकेला नेमकं काय सुनावलं आहे?

Mayur Ratnaparkhe

Trump’s Accusations: What Triggered the Latest Trade Tensions : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून सातत्याने, धक्कादायक विधानं करत आहेत. आता त्यांनी भारताला लक्ष्य केले आहे. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करत आहे आणि नंतर त्या तेलाचा मोठा भाग आंतरराष्ट्रीय बाजारात चढ्या किमतीत विकून मोठा नफा कमवत आहे. असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. यावर भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हे आरोप अन्याय्य आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी अधिकृत निवेदन जारी करून म्हटले आहे की, भारताला लक्ष्य करणे केवळ चुकीचेच नाही तर या देशांच्या बोलण्यात आणि कृतीतील फरक देखील उघड करते.  तसेच, भारताला रशियाकडून तेल आयात करण्यास भाग पाडले गेले, कारण युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंतर पारंपारिक पुरवठादारांनी त्यांचा पुरवठा युरोपकडे वळवला होता. त्यावेळी, अमेरिकेनेच भारताला अशी पावले उचलण्यास प्रोत्साहित केले होते जेणेकरून जागतिक ऊर्जा बाजार स्थिर राहू शकेल.

याशिवाय ते म्हणाले की, भारतीय ग्राहकांना स्वस्त आणि स्थिर ऊर्जा मिळावी यासाठी भारताची ही आयात आवश्यक आहे. हा पर्याय नाही तर जागतिक बाजारपेठेची मजबूरी आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतावर टीका करणारे देश स्वतः रशियासोबत व्यवसाय करत आहेत हे आश्चर्यकारक आहे, खरंतर ती त्यांच्यासाठी राष्ट्रीय अत्यावश्यकताही नाही.

याआधी ट्रम्प यांच्या टॅरिफ बाबतच्या घोषणेवर, भारताने कोणताही बदला न घेता स्पष्ट शब्दात सांगितले होते की राष्ट्रीय हितासाठी शक्य ती सर्व पावले उचलली जातील. त्याच वेळी, एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले होते की भारत अमेरिकेच्या टॅरिफला वाटाघाटीच्या टेबलावर उत्तर देईल.

ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात भारतावर २५ टक्के कर लावण्याची घोषणा केली होती, जी १ ऑगस्टपासून लागू होणार होती. पण आता ती एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. अमेरिकेने जारी केलेल्या नवीन सूचनांमध्ये, हा कर आता सात दिवसांनंतर बांगलादेश, ब्राझील आणि भारतासह इतर देशांवर लागू केला जाईल, जो ७ ऑगस्ट २०२५ पासून लागू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral : गुजरातमध्ये हत्तीवर अन्याय! व्हिडीओ व्हायरल; 'महादेवी'प्रमाणे पेटा लक्ष घालणार का?

Local Block: मोठी बातमी! ५ ते ८ ऑगस्टपर्यंत लोकलचा विशेष ब्लॉक, सेवा पूर्णपणे बंद राहणार, जाणून घ्या वेळापत्रक

Truck Accident : गोंडपिपरीत विचित्र अपघात! ट्रॅकने एक किलोमीटर नेले फरफटत; एकाचा मृत्यू, तीन गंभीर

Trump accuses India :''रशियाकडून तेल खरेदी करून भारत कमावतोय नफा'' ट्रम्प यांचा आरोप; अन् टॅरिफ वाढवण्याचीही धमकी!

Mumbai Weather: उकाड्यामुळे मुंबईकर हैराण! आता पाऊस कधी दरवाजा ठोठावणार? हवामान विभागाने वेळच सांगितली

SCROLL FOR NEXT