nirmala 
देश

100 वर्षांत असा अर्थसंकल्प पाहिला नसेल जो कोरोना संकटानंतर येईल - निर्मला सितारमण

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटाने देशाच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसली आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प अभूतपूर्व असेल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं. सरकार कोरोनामुळे फटका बसललेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. आरोग्य, संशोधन आणि विकासात गुंतवणूक टेलिमेडिसिनसाठी मोठ्या प्रमाणावर कौशल्य विकास महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं निर्मला सितारमण म्हणाल्या.

सीआयआयद्वारे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सितारमण यांनी सांगितलं की, मला तुमच्याही सुचना पाठवा. ज्यामुळे आम्ही असा अर्थसंकल्प तयार करू जो याआधी कधीच आला नसेल. भारताने 100 वर्षात असा अर्थसंकल्प पाहिला नसेल जो कोरोनाच्या संकटानंतर येईल.

निर्मला सितारमण म्हणाल्या की, अर्थसंकल्प तोपर्यंत शक्य नाही जोपर्यंत तुमच्या सूचना आणि इच्छांची यादी मिळत नाही. अर्थव्यवस्थेसमोरच्या आव्हानांमधून तुमच्या मनात जे विचार आले असतील त्याची संपूर्ण माहिती घ्यायला हवी. त्याशिवाय मला अभूतपूर्व असं बजेट तयार करणं अशक्य आहे. 

आर्थिक वर्ष 2021-22 मधील अर्थसंकल्प संसदेत एक फेब्रुवारी 2021 ला सादर करण्यात येईल. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी म्हटलं की, अर्थव्यवस्था पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी त्या क्षेत्रांमध्ये काम व्हायला हवं ज्यांच्यावर कोरोनामुळे प्रचंड परिणाम झाला आहे. तसंच अशी क्षेत्रे जी पुढे विकासात योगदान देतील त्यावर लक्ष द्यायला पाहिजे. 

आपला आकार, लोकसंख्या आणि ताकद लक्षात घेऊन भारताच्या अर्थव्यवस्थेच्या चांगल्या वृद्धीसाठी मला हे सांगायला संकोच नाही की आम्ही काही देशांसोबत जागतिक विकासातही भूमिका बजावणार आहे. जागतिक आर्थिक विकासात आपले योगदान महत्त्वाचे असेल असंही निर्मला सितारमण यांनी सांगितलं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

Fashion Psychology: सुंदर कपड्यांमुळे खरोखरच तुमचा मूड बदलतो का? जाणून घ्या डोपामिन ड्रेसिंग आणि मेंदूचं कनेक्शन!

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

SCROLL FOR NEXT