Indian_Army_Ladakh 
देश

लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भारतीय सैन्याने चीनी सैनिकाला पकडले!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सीमांवर गेल्या काही दिवसांपासून सतत तणावाचे वातावरण राहिले आहे. या पार्श्वभूमीवरच पूर्व लडाखच्या चुशूल सेक्टरमधील गुरंग हिल परिसरात भारतीय सैन्याने एका चीन सैनिकाला ताब्यात घेतलं आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीचा हा सैनिक भारतीय हद्दीत कसा आला याची चौकशी सुरू झाली आहे.

भारतीय सैन्याने त्याच्याकडे चौकशी केली असता तो चुकून भारतीय हद्दीत आल्याची माहिती मिळाली आहे. एनआयएने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय सेनेने चीनला संबंधित सैनिकाबद्दल कळविले आहे. या मुद्द्यावर सध्या चर्चा सुरू असून उद्या पर्यंत त्याला पुन्हा चीनच्या ताब्यात दिले जाईल. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीपील्स लिबरेशन आर्मीचा हा सैनिक सकाळच्या सुमारास भारतीय हद्दीत आला होता. त्यानंतर भारतीय सैन्याने त्याला ताब्यात घेऊन नियमांनुसार त्याची चौकशी केली जात आहे. कोणत्या कारणासाठी तो भारतीय हद्दीत आला, यामागे काय कारण होते का? अशा सर्व  प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न भारतीय सैन्य करत आहे. 

यापूर्वीही एका चीनी सैन्याला पकडले होते
भारतीय सीमेच्या हद्दीत चीनी सैनिक आढळण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीय. याआधीही एका चीनी सैनिकाला पकडण्यात आले होते. पण काही दिवसातच त्याला परत चीनच्या ताब्यात देण्यात आले. 

पूर्व लडाख आणि एकूणच भारत-चीन सीमेवर गेल्यावर्षीपासून तणावाचे वातावरण राहिले आहे. दोन्ही देशांनी लडाखमधील जमिनीवर आपला हक्क दाखवला आहे. तसेच लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर अनेकवेळा चर्चा करण्यात आली असून अजूनही काही तोडगा निघालेला नाही. गेल्या वर्षी जून महिन्यात लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैन्यात संघर्ष झाला होता. त्यानंतर पँगाँग लेक भागात गोळीबारच्या घटना घडल्या होत्या. भारतीय सैन्यानेही जशास तसे उत्तर दिले होते. पँगाँगच्या फिंगर फोर परिसरात चीन सैन्य माघार घेत नसल्याने तेथील महत्त्वाच्या टेकड्या ताब्यात घेत भारतीय सैन्याने चीनच्या हालचालींवर लक्ष राहिल अशी व्यवस्था उभी केली आहे.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali Traffic: पुणे-नाशिक महामार्गावर रांगा ;दिवाळीसाठी गावाकडे धाव ; हिवरगाव पावसा टोलनाक्यावरील स्थिती

Pune Crime News : पुण्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला रक्तरंजित थरार; कोथरूडमध्ये तरुणाची कोयत्याने वार करून हत्या

Ahilyanagar News: तरुणाने जीव संपवला; पत्नीसह आठ जणांवर गुन्हा

Latest Marathi News Live Update: इंधनाची गुणवत्ता आणि वापराबाबतच्या तक्रारींची सविस्तर चौकशी सुरू- मुख्यमंत्री डी. के शिवकुमार

Chh.Sambhajinagar Crime News: पत्नीची छेड काढल्याचा राग मनात धरला; कट रचून लेबर कंत्राटदाराचे अपहरण, करमाड एमआयडीसीत हत्या

SCROLL FOR NEXT